अनुजा सावंत ‘ज्युनिअर स्ट्राँग गर्ल’
By Admin | Published: November 5, 2016 10:58 PM2016-11-05T22:58:53+5:302016-11-06T00:42:49+5:30
वेटलिफ्टींग स्पर्धा : प्रथमेश पावसकर ‘ज्युनिअर स्ट्राँग मॅन आॅफ रत्नागिरी’
रत्नागिरी : जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग अजिंक्य स्पर्धेत अनुजा सावंत हिने एकूण ११३ किलो वजन उचलून युथ व ज्युनिअर गटाचा ‘स्ट्राँग गर्ल आॅफ रत्नागिरी’ हा पुरस्कार पटकावला. तसेच जिल्हास्तरीय ज्युनिअर पुरुष गटात प्रथमेश पावसकर याने एकूण १८० किलो वजन उचलून सुवर्ण पदकासह ‘ज्युनिअर स्ट्राँग मॅन आॅफ रत्नागिरी’ पुरस्कार पटकावला.
राज्य स्पर्धेच्या अनुषंगाने नुकत्याच झोरेज् स्पोर्टस् अॅकॅडमी, रत्नागिरी येथे पार पडलेल्या १२ वी युथ व १६ वी ज्युनिअर मुले, मुली जिल्हास्तरीय वेटलिफ्टींग अजिंक्यपद स्पर्धा व जिल्हा निवड चाचणी रत्नागिरीत पार पडली. यामध्ये अनुजा सावंत हिने जिल्हास्तरीय युथ व ज्युनिअर महिलांच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून चमकदार कामगिरी केली.
या जिल्हास्तरीय स्पर्धा रत्नागिरी वेटलिफ्टींग असोसिएशनच्यावतीने घेण्यात आल्या. या स्पर्धेत विविध शाळा, महाविद्यालये तसेच संस्थांचे खेळाडू सहभागी झाले होते.
जिल्हा युथ स्पर्धेत (मुली) ४४ किलो वजनगट - दीप्ती वेदरे (करबुडे हायस्कूल, रत्नागिरी) सुवर्ण, प्राची सुपल (शिर्के हायस्कूल) रौप्य, ५३ किलो वजनगट - ऋतुजा आग्रे (करबुडे हायस्कूल) सुवर्ण, ५८ किलो वजनगट - सुप्रिया देसाई (विजू नाटेकर कनिष्ठ महाविद्यालय) सुवर्ण, ७५ किलो वजनगट - अनुजा सावंत (ज्युनिअर कॉलेज, पाली) सुवर्ण पदकाची कमाई केली.
जिल्हा ज्युनिअर महिला ४८ किलो वजनगट - धनश्री शेलार (नवनिर्माण वरिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी) सुवर्ण, ७५ किलो वजनगट - अनुजा सावंत (कनिषठ महाविद्यालय, पाली) सुवर्ण, प्रतीक्षा साळवी (नवनिर्माण वरिष्ठ महाविद्यालय) रौप्य.
जिल्हा ज्युनिअर पुरुष १०५ किलो वजनगट - प्रथमेश पावसकर (नवनिर्माण वरिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी) याने सुवर्णपदक पटकावले. या सर्व खेळाडूंची ४ ते ७ नोव्हेंबर दरम्यान रावेर (जळगाव) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय युथ १ ज्युनिअर स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड झाली आहे. यशस्वी खेळाडूंचा शाळा मुख्याध्यापक, प्राचार्य तसेच भारती पाटील, संघटनेचे सचिव व राष्ट्रीय पंच संजय झोरे, समिधा झोरे, छत्रपती पुरस्कार विजेती प्रियदर्शनी जागुष्टे यांनी अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)
स्पर्धेसाठी रवाना
रावेर (जळगाव) येथे राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेला दिनांक ४ नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेसाठी अनुजा सावंत आणि प्रथमेश पावसकर यांच्यासह अन्य खेळाडू रवाना झाले आहेत.