चिंता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:22 AM2021-06-25T04:22:50+5:302021-06-25T04:22:50+5:30
जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर वाढल्यामुळे रत्नागिरी जिल्हा चौथ्या टप्प्यातच राहिला आहे. त्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवावी अशा सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात ...
जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर वाढल्यामुळे रत्नागिरी जिल्हा चौथ्या टप्प्यातच राहिला आहे. त्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवावी अशा सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार ७,००० चाचण्या करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. गेल्या ८ दिवसांत ५००० पर्यंत मजल मारण्यात यश आले आहे. बाधित रुग्ण जास्त प्रमाणात सापडत असल्याने आराेग्य विभागाकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील काेराेनाबाधितांची संख्या कमी येत नसल्याने चिंता वाढत आहे़ त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून निर्बंध शिथिल करण्याची घाई न करण्याच्या सूचना केल्या आहेत़ त्यामुळे जिल्ह्यातील निर्बंध अधिक कडक हाेण्याची शक्यता वाढली आहे. त्यातच थेट केंद्रीय आराेग्यमंत्र्यांनी वाढत्या संख्येमुळे चिंता व्यक्त केली आहे़ त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यावर दाेन्ही सरकारने लक्ष केंद्रित केले आहे़