सोहमच्या शस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन

By admin | Published: July 15, 2014 11:39 PM2014-07-15T23:39:16+5:302014-07-15T23:43:49+5:30

ब्रेनट्यूमर झाल्याने संकट

Appeal for Soham Surgery | सोहमच्या शस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन

सोहमच्या शस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन

Next

मार्लेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील सोहम हरिश्चंद्र देवळेकर (११) या शाळकरी मुलाला ब्रेनट्यूमर झाला आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे सोहमवर होणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन देवळेकर कुटुंबीयांच्यावतीने करण्यात आले आहे.
सोहम इयत्ता पाचवीत शिकत आहे. मात्र, त्याला दोन महिन्यांपूर्वी त्रास जाणवू लागल्याने घरच्या मंडळींनी मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी सोहमला ब्रेनट्यूमर झाल्याचे निदान केले होते. या आजारासाठी शस्त्रक्रिया करणे हा एकच पर्याय असतो. पण, शिक्षणासाठी धडपडणाऱ्या सोहम याच्या घरची परिस्थिती बेताची आहे. रोज परिस्थितीशी संघर्ष करून जगणाऱ्या देवळेकर कुटुंबाने जिद्दीने सोहमला शिकवण्याचे ठरवले असतानाच त्याच्यावर गंभीर आजाराची आफत ओढवली आहे. त्याच्यावर होणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी सुमारे ४ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सोहमवर सध्या तेथेच उपचार सुरु आहेत. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च देवळेकर कुटुंबाला परवडणारा नाही. समाजातील दानशूर मंडळींनी आर्थिक मदत करावी, यासाठी ८६५२१४२११३ या मोबाईलवर संपर्क साधावा किंवा बॉम्बे हॉस्पिटलच्या नावे मदत द्यावी, असे आवाहन देवळेकर यांनी केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Appeal for Soham Surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.