ओरी मधलीवाडी येथील शिमगोत्सवाच्या नियोजनाचे कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:33 AM2021-04-02T04:33:14+5:302021-04-02T04:33:14+5:30
जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील ओरी-मधलीवाडी येथे श्रीदेव केदारलिंग, श्रीदेवी महालक्ष्मी, श्रीदेवी त्रिमुखीचा शिमगाेत्सव काेराेनाचे नियम पाळून साजरा करण्यात आला. ...
जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील ओरी-मधलीवाडी येथे श्रीदेव केदारलिंग, श्रीदेवी महालक्ष्मी, श्रीदेवी त्रिमुखीचा शिमगाेत्सव काेराेनाचे नियम पाळून साजरा करण्यात आला. उत्सवादरम्यान करण्यात आलेल्या नियाेजनाचे ग्रामीण पाेलिसांकडून विशेष काैतुक करण्यात आले.
राज्य शासनाने केलेल्या सूचना व आदेशाचे पालन करून सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्सिंग ठेवून देवीला-पालखीला रुपे लावणे, माड आणणे व सहाण भरणे या पारंपरिक धार्मिक गोष्टी नियोजनात्मक करण्यात आल्या. दरवर्षीप्रमाणे पालखी घरोघरी घेऊन जाण्याची प्रथा यावेळी थांबवून ती सार्वजनिक ठिकाणी म्हणजे सहाणेवर ठेवून सर्वच भक्तांना गावकऱ्यांना वाडीनुसार प्रत्येकाला दिवस व वेळ ठरवून देऊन त्याप्रमाणे सहाणेवरच ओटी, भेट, नवस भरण्याचे ठरविले व तशी कार्यवाही सुरू झाली आहे.
कोविडचा संसर्ग होऊ नये यासाठी ग्रामस्थांनी गावांमध्ये जनजागृती मोहीम राबविली. यासाठी ग्रामस्थांनी उत्तम प्रतिसाद दिला. शिमगा उत्सवाचे नियोजन व कार्यवाही पाहून रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकाचे जाकादेवी पंचक्रोशीचे बीट अंमलदार जोशी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून गावकऱ्यांचे कौतुक केले. ओरी-मधलीवाडीने आदर्शवत नियोजन करून इतर गावांनाही एक चांगला, नवीन आदर्श घालून दिल्याचे जाेशी यांनी सांगितले.
यावेळी गावप्रमुख शंकर भागोजी शेवडे, सुधाकर भिकाजी घवाळी तसेच गाव कमिटीचे दीपक येलये, रघुनाथ डावल, संजय वेलोंडे, दत्ताराम सावंत, संजय येलये, स्वप्निल शिंदे, संदीप कोलगे, प्रकाश गोताड, प्रकाश गराटे, सदानंद गोताड, दिलीप जोशी, संतोष सुवरे, अनंत घाणेकर, महादेव कळंबटे, सुरेश पातये यांनी शिमगाेत्सवाचे नियाेजन केले हाेते.