रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४४८ पदनिर्मितीसह १०५.७८ कोटी रुपये खर्चास मान्यता

By शोभना कांबळे | Published: June 17, 2023 02:03 PM2023-06-17T14:03:40+5:302023-06-17T14:04:03+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश सुरु होणार

Approval of Rs.105.78 crore expenditure for Ratnagiri Medical College with creation of 448 posts | रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४४८ पदनिर्मितीसह १०५.७८ कोटी रुपये खर्चास मान्यता

रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४४८ पदनिर्मितीसह १०५.७८ कोटी रुपये खर्चास मान्यता

googlenewsNext

रत्नागिरी : रत्नागिरी येथे १०० विद्यार्थी क्षमतेसह संलग्नीत ४३० खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास मागील वर्षी मान्यता देण्यात आली होती. आता रत्नागिरी वैद्यकीयमहाविद्यालयासाठी ४४८ पदनिर्मितीस मान्यता देण्यात आली असून, याकरीता १०५.७८ कोटी रुपये खर्चासही मान्यता देण्यात आली आहे. ही माहिती ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडामंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

मंत्री महाजन म्हणाले की, युती शासनाच्या काळात मागील ९ वर्षात १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यात आले आहेत. रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तसेच सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास संलग्नित ५०० रुग्ण खाटांच्या रुग्णालयाच्या रुपात कोकणवासीयांना शासनाने दुहेरी आरोग्यदायी भेट दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्यानंतर मागील जवळपास ६० वर्षात केवळ ११ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यात आली आहेत. तर सन २०१४ पासून २०२३ पर्यंत ९ वर्षात १० वैद्यकीय महाविद्यालये राज्यात सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे दरवर्षी हजारो नवीन डॉक्टर्स निर्माण होऊन राज्यभर आरोग्य सेवेचा विस्तार होणार आहे.

रत्नागिरी येथील नवीन वैद्यकीय महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. ज्या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालये नाहीत, अशा ९ जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्याच्या प्रस्तावास लवकरच मान्यता देण्यात येणार असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश सुरु होणार

रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सन २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यास केंद्राचा हिरवा कंदील मिळाला आहे. या शैक्षणिक वर्षापासून प्रथम वर्षाचे प्रवेश सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सिंधुदुर्गात १०८६ पद निर्मितीस मान्यता

तसेच सिंधुदुर्ग येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित ५०० रुग्णखाटांच्या रुग्णालयाकरीता आवश्यक एकूण १०८६ पदनिर्मितीसही मान्यतेचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. त्यासाठी १०९.१९ कोटी रुपयांचा भार शासनाच्या तिजोरीवर पडणार आहे. सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यापूर्वीच सुरु झाले आहे.

Web Title: Approval of Rs.105.78 crore expenditure for Ratnagiri Medical College with creation of 448 posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.