पाणी योजनेसाठी निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:33 AM2021-05-06T04:33:25+5:302021-05-06T04:33:25+5:30
आवाशी : खेड तालुक्यातील वावेतर्फे नातू बौद्धवाडीच्या नळपाणी योजनेसाठी शासनाच्या मूलभूत सुविधांतर्गत १५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. ...
आवाशी : खेड तालुक्यातील वावेतर्फे नातू बौद्धवाडीच्या नळपाणी योजनेसाठी शासनाच्या मूलभूत सुविधांतर्गत १५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या गावाला दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे ग्रामस्थांनी पाणीयोजनेची मागणी केली होती. त्याची दखल आमदार योगेश कदम यांनी घेतल्याने त्यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला आहे.
पावसाची प्रतीक्षा
रत्नागिरी : सध्या सर्वत्रच उकाड्याने उच्चांक गाठला आहे. दिवसेंदिवस वाढू लागलेल्या उष्म्याने नागरिकांना हैराण केले आहे. जिल्ह्याच्या काही भागात अधूनमधून पाऊस पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामान खात्यानेही पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. सध्या काही वेळा पावसाची शक्यता वाटू लागत आहे. मात्र, पुन्हा आकाश निरभ्र होत आहे.
ताण वाढला
रत्नागिरी : आरोग्य यंत्रणेत अजूनही काही रिक्त पदे तशीच आहेत. विशेषत: डॉक्टरांच्या पदासाठी म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येच्या वाढत्या प्रमाणात कर्मचारी वर्ग अपुरा पडत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे.
कोकणी मेव्यावर परिणाम
रत्नागिरी : लॉकडाऊनचा परिणाम कोकणी मेव्याच्या उत्पादनावर होऊ लागला आहे. कोकणात येणाऱ्या पर्यटकांकडूनही या उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मात्र, या वर्षी पर्यटनच पूर्णपणे ठप्प झाले आहे. त्यामुळे त्याचा परिणाम कोकणी मेव्याच्या विक्रीवर मोठ्या प्रमाणावर होत आहे.
व्हेंटिलेटर्स अपुरे
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्या तुलनेने ऑक्सिजनचा पुरवठा बऱ्यापैकी होऊ लागला असला, तरी ऑक्सिजन बेड अपुरे पडत आहेत. व्हेंटिलेटर्स कमतरतेमुळे अनेक रुग्णांना शासकीय, तसेच खासगी रुग्णालयांमध्येही दाखल करणे अशक्य होत आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे.