वाटदमध्ये विहिरीवर पंपाची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:22 AM2021-06-03T04:22:35+5:302021-06-03T04:22:35+5:30

रत्नागिरी : तालुक्यातील वाटद जिल्हा परिषद गटातील मिरवणे - आवडवाडी येथे शिवसेनेतर्फे विहिरीवर पंप बसवून ग्रामस्थांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात ...

Arrangement of pump on well in Watad | वाटदमध्ये विहिरीवर पंपाची व्यवस्था

वाटदमध्ये विहिरीवर पंपाची व्यवस्था

Next

रत्नागिरी : तालुक्यातील वाटद जिल्हा परिषद गटातील मिरवणे - आवडवाडी येथे शिवसेनेतर्फे विहिरीवर पंप बसवून ग्रामस्थांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांच्या डोक्यावरील हंडा हलका झाला आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, शिवसेना तालुकाप्रमुख तथा नगराध्यक्ष बंड्या साळवी, उद्योजक भैया सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद तथा नियोजन समिती सदस्य ऋतुजा राजेश जाधव, पंचायत समिती सभापती संजना उदय माने यांनी वाटद गणात पथदीप, पाणी, रस्ते, शाळा, अंगणवाडी इमारत, कोविड रुग्ण, लसीकरण या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्याचवर्षी नाविन्यपूर्ण योजनेतून ऋतुजा जाधव यांनी आपल्या निधीतून मिरवणे - आवडवाडी येथे नवीन विहीर बांधली. या विहिरीवर आता पंप बसविण्यात आल्याने महिलांचे श्रम कमी झाले आहेत.

या पंपाच्या उद्घाटन कार्यक्रमाला सभापती संजना माने, जिल्हा परिषद सदस्य ऋतुजा जाधव यांच्यासह विभागप्रमुख बाबय कल्याणकर, विभाग संघटक उदय माने, अनिकेत सुर्वे, बापू घोसाळे, ग्रामपंचायत सदस्य सचिन ढवळे, पालये, संतोष निंबाळकर, सुहास पालये, पंढरीनाथ निंबरे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Arrangement of pump on well in Watad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.