जिल्ह्यात ७८ कोटी २६ लाखाची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 12:50 PM2020-11-24T12:50:54+5:302020-11-24T12:52:47+5:30
mahavitran, ratnagirinews, bill वीजबिल वसुलीमध्ये अग्रेसर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख ६७ हजार ७०३ ग्राहकांनी वीजबिल न भरल्यामुळे जिल्ह्यात सध्या ७८ कोटी २६ लाख ९६ हजार रुपये थकबाकी आहे. कोरोना कालावधीत अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या महावितरणपुढे कोट्यवधी रुपयांच्या वसुलीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
मेहरून नाकाडे
रत्नागिरी : वीजबिल वसुलीमध्ये अग्रेसर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख ६७ हजार ७०३ ग्राहकांनी वीजबिल न भरल्यामुळे जिल्ह्यात सध्या ७८ कोटी २६ लाख ९६ हजार रुपये थकबाकी आहे. कोरोना कालावधीत अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या महावितरणपुढे कोट्यवधी रुपयांच्या वसुलीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी घरगुती ग्राहकांची आहे. एक लाख ३९ हजार ९५९ ग्राहकांकडे ४० कोटी ८८ लाख ७१ हजार रुपयांची थकबाकी आहे. एप्रिलपासून काही ग्राहकांनी वीजबिले न भरल्यामुळे थकबाकीची रक्कम वाढली आहे. त्यापाठोपाठ वाणिज्यिकच्या १७ हजार ५०४ ग्राहकांकडे १५ कोटी २९ लाख १८ हजार रुपयांची थकबाकी आहे. महावितरणकडून वेळोवेळी आवाहन करूनही ग्राहकांकडून फारसा प्रतिसाद लाभत नसल्याने थकबाकीचे आकडे वाढले आहेत.
थकीत वीजबिल भरण्याचे शासन आदेश आल्याने ग्राहकांना प्रत्यक्ष भेटून वीजबिल भरण्याची विनवणी करण्यात येणार आहे. थकबाकीची रक्कम एकाचवेळी भरणे ग्राहकांना अशक्य असल्याने सात हप्त्यांमध्ये भरण्याची ग्राहकांना सवलत महावितरणतर्फे दिली जाणार आहे. निव्वळ खासगी ग्राहकांचे नाही तर सरकारी बिलांची थकबाकीही वाढली असल्याने वसुलीचे फार मोठे आव्हान महावितरणपुढे उभे राहिले आहे. वाढीव बिलांबाबत लोकांमध्ये तीव्र नाराजी असल्याने थकबाकीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळेही वसुलीचे प्रमाण वाढत चालले आहे.
सहकार्य करावे
कोरोना व ह्यनिसर्गह्ण चक्रीवादळ काळात ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी अखंडित वीजपुरवठा ठेवला होता. ग्राहकांनी वीजबिले भरून सहकार्य करावे.
- देवेंद्र सायनेकर,
प्रभारी मुख्य अभियंता, महावितरण