संचारबंदीचा फायदा घेऊन अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्याला मुद्देमालासह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 05:42 PM2021-04-12T17:42:00+5:302021-04-12T17:45:53+5:30

liqer Ban Khed Ratnagiri : लॉकडाऊन कालावधीत पोलीस बंदोबस्तात व्यस्त असल्याचा फायदा घेऊन अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्या एकाला खेड पोलिसांनी मुद्देमालासह रविवारी रात्री ७.४५ वाजण्याच्या दरम्याने ताब्यात घेतले आहे. संतोष अशोक कदम (३०, रा. मौजे चिंचघर, वेताळवाडी, खेड) असे अटक केलेल्या दारू विक्रेत्याचे नाव आहे.

Arrest of a person selling liquor illegally by taking advantage of the curfew | संचारबंदीचा फायदा घेऊन अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्याला मुद्देमालासह अटक

संचारबंदीचा फायदा घेऊन अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्याला मुद्देमालासह अटक

googlenewsNext
ठळक मुद्देखेड पोलिसांची कारवाई, घराच्या परिसरात चढ्या दराने विक्री पोलीस बंदोबस्तात व्यस्त असल्याचा उठवला फायदा

खेड : लॉकडाऊन कालावधीत पोलीस बंदोबस्तात व्यस्त असल्याचा फायदा घेऊन अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्या एकाला खेड पोलिसांनी मुद्देमालासह रविवारी रात्री ७.४५ वाजण्याच्या दरम्याने ताब्यात घेतले आहे. संतोष अशोक कदम (३०, रा. मौजे चिंचघर, वेताळवाडी, खेड) असे अटक केलेल्या दारू विक्रेत्याचे नाव आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशीकिरण काशीद व खेडच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कामगिरी केली. मौजे चिंचघर, वेताळवाडी येथील संतोष अशोक कदम हा सध्या कोविड-१९ च्या अनुषंगाने लॉकडाऊन सुरु असल्याचा फायदा घेऊन त्याचे घराचे पाठीमागे मोकळ्या जागेत गैरकायदा बिगरपरवाना देशी-विदेशी बनावटीच्या कंपनीची दारुची दुकानातील दरापेक्षा अधिक दराने विक्री करत होता.

ही माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे व तपास पथक अंमलदार पोलीस नाईक विरेंद्र आंबेडे, पोलीस शिपाई संकेत गुरव, साजिद नदाफ, अजय कडू, महिला पोलीस कॉन्स्टेबल सीमा मोरे यांनी संतोष अशोक कदम यांच्या घराचे परिसरात धाड टाकली. या धाडीत गोवा बनावटीची विदेशी दारु गैरकायदा बिगरपरवाना लोकांना चढ्या भावाने विक्री करणेसाठी त्याचे ताब्यात बाळगलेल्या स्थितीत रंगेहाथ पकडून मुद्देमाल जप्त केला. त्याचे विरुद्ध खेड पोलीस स्थानकात महाराट्र दारुबंदी कायद्याचे कलम ६६ (१) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करण्यात आली आहे.

Web Title: Arrest of a person selling liquor illegally by taking advantage of the curfew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.