एका वर्षाच्या आत राजापुरात गंगामाईचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 12:20 PM2020-04-15T12:20:59+5:302020-04-15T12:23:14+5:30
राजापूर : देशभरात प्रसिद्ध असलेल्या राजापूरच्या गंगामाईचे बुधवारी सकाळी ६ वाजता आगमन झाले आहे. गतवर्षी 2४ एप्रिल रोजी गंगामाईचे ...
राजापूर : देशभरात प्रसिद्ध असलेल्या राजापूरच्या गंगामाईचे बुधवारी सकाळी ६ वाजता आगमन झाले आहे. गतवर्षी 2४ एप्रिल रोजी गंगामाईचे आगमन झाले होते.त्यानंतर ६२ दिवसानी म्हणजेच २४ जून रोजी गंगामाई अंतर्धान पावली होती . एका वर्षाच्या आत म्हणजे सुमारे ९ महिण्यानी पुन्हा गंगामाई अवतरली आहे .
सध्या देशावर कोरोणाचे सावट असल्यामुळे गंगाक्षेत्रावर कोणीही नव्हते त्यामुळे आज मंगळावारी नेमके किती वाजता आगमन झाले याची अचूक माहीती मिळू शकली नसली तरी गंगामाई संस्थान चे सचिव गंगापूत्र श्रीकांत घुगरे यानी अंदाजे सकाळी ६ वाजता गंगामाईचे आगमन झाल्याची माहीती लोकमतला दिली आहे .
लॉकडाउन व संचारबंदी असल्यामुळे गंगाक्षेत्रावर पहिल्यांदाच शुकाशुकाट पहावयास मिळत आहे . प्रत्येक वेळी गंगामाईचे आगमन झाले की भक्तांची गंगाक्षेत्रा गर्दी होते मात्र यावेळी संचारबंदीमुळे शांतता आहे .