कलादालनात कलाकारांचे प्रदर्शन भरवले पाहिजे : प्रकाश राजेशिर्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:32 AM2021-09-19T04:32:32+5:302021-09-19T04:32:32+5:30
गुहागर : सुसज्ज अशा कलादालनात चांगल्या कलाकारांचे प्रदर्शन भरवले गेले पाहिजे. या कलादालनाच्या पुढील दुरुस्ती देखभालीसाठी खर्च अपेक्षित असून, ...
गुहागर : सुसज्ज अशा कलादालनात चांगल्या कलाकारांचे प्रदर्शन भरवले गेले पाहिजे. या कलादालनाच्या पुढील दुरुस्ती देखभालीसाठी खर्च अपेक्षित असून, त्यासाठी आतापासून संस्थेने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रकार, शिल्पकार प्रकाश राजेशिर्के यांनी केले.
येथील श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील कुमार प्रज्वल पंढरीनाथ गुहागरकर कला दालनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्र शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बाेलत हाेते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल स्कूल कमिटी सदस्य रवींद्र कानिटकर होते. प्रास्ताविकामध्ये बोलताना मुख्याध्यापक मनोज जोगळेकर यांनी सांगितले की, कलादालनाचा उपयोग चित्रकलेला होईलच त्याचबरोबर इतरही चांगले कलाकार निर्माण करण्याचा प्रयत्न असेल. कलादालनाचे निर्माते पंढरीनाथ गुहागरकर यांनी सांगितले की, चित्रकार विद्यार्थी घडविण्यासाठी या ठिकाणी कलादालनाची निर्मिती करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक विचारे यांनी केले. यावेळी वास्तू शिल्पकार अनिकेत कुंभार, राहुल कुंभार, उपसरपंच महेश वेल्हाळ, महेश तोडणकर, चंद्रहास चव्हाण, डॉ. प्रतीक गुहागरकर, प्रथमेश गुहागरकर, प्रांजली गुहागरकर, भीमराव कुंभार, केंद्रप्रमुख श्रीकांत वेल्हाळ, राजन सिंह, सह्याद्री स्कूल ऑफ आर्टचे माणिक यादव, सह्याद्री पॉलिटेक्निकचे प्राचार्य मंगेश भोसले उपस्थित होते.