कलासक्त जीवनशैली जगाकडे सकारात्मक पाहायला लावते : प्रदीप कामथेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:38 AM2021-07-07T04:38:50+5:302021-07-07T04:38:50+5:30
रत्नागिरी : कलासक्त जीवनशैली जगाकडे सकारात्मकतेने पाहायला लावते. यशस्वी होण्याकरिता प्रथम स्वत:ला ओळखणे, स्वत:मधील सुप्त गुणांना वाव देणे, महत्त्वाचे ...
रत्नागिरी : कलासक्त जीवनशैली जगाकडे सकारात्मकतेने पाहायला लावते. यशस्वी होण्याकरिता प्रथम स्वत:ला ओळखणे, स्वत:मधील सुप्त गुणांना वाव देणे, महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे वित्तीय लेखागार प्रदीप कामथेकर यांनी केले. मुंबई विद्यापीठाच्या येथील उपकेंद्राच्या परिसरात आभासी पद्धतीने दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बक्षीस वितरणवेळी ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
संचालक प्रा. डाॅ. किशोर सुखटणकर यांच्या संकल्पनेतून हा आभासी कार्यक्रम साकार झाला. यातील सर्व कलाप्रकारांना विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.
गेल्या वर्षभरापासून आभासी पद्धतीने अध्यापन - अध्ययन चालले होते. त्याच पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम कसा होईल, याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र, सर्वच कलाप्रकारात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यात गायन, वाद्यवादन, अपसायकलिंग, कवितालेखन, निबंधलेखन, पोस्टर मेकिंग अशा विविध प्रकारांचा समावेश होता. या नावीन्यपूर्ण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डाॅ. सुखटणकर यांनी या उपपरिसरात चालणाऱ्या विविध उल्लेखनीय उपक्रमांबाबत माहिती दिली. कलेचे मानवी जीवनातील महत्त्व त्यांनी यावेळी कथन केले.
वितरण कार्यक्रमासाठी मुंबई विद्यापीठाचे वित्तीय लेखागार प्रदीप कामथेकर प्रमुख अतिथी होते. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी शिक्षकांनी आजन्म विद्यार्थी म्हणून दृष्टिकोन ठेवला पाहिजे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पूनम गायकवाड तसेच विद्यार्थ्यांनी केले. हा आभासी कार्यक्रम यशस्वी केल्याबद्द्ल संचालकांनी सांस्कृतिक समिती, सहभागी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
................
आभासी सांस्कृतिक कार्यक्रमात झालेल्या विविध स्पर्धांचे निकाल असे : पोस्टर मेकिंगमध्ये सृष्टी तावडे, गायन वैष्णवी चव्हाण, कवितालेखन आसावरी काळे, निबंधलेखन ओमकार गुरव, अपसायकलिंग शीतल फटकरे, वाद्यवादन कैलास दामले यांनी प्रथम क्रमांक मिळविले. मान्यवरांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.