रत्नागिरीची आर्या डोर्लेकर महाराष्ट्र खाे-खाे संघात, छत्तीसगड येथे राष्ट्रीय स्पर्धा
By अरुण आडिवरेकर | Published: December 26, 2023 02:49 PM2023-12-26T14:49:49+5:302023-12-26T14:50:14+5:30
रत्नागिरी : नंदूरबार येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेतून महाराष्ट्राचे कुमार व मुली संघ सचिव ॲड. ...
रत्नागिरी : नंदूरबार येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेतून महाराष्ट्राचे कुमार व मुली संघ सचिव ॲड. गोविंद शर्मा यांनी जाहीर केले. हे संघ छत्तीसगड येथे होणाऱ्या ४२ व्या कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणार आहेत. कुमार संघाच्या कर्णधारपदी वैभव मोरे (ठाणे) तर मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी दीपाली राठोड (पुणे) यांची निवड झाली आहे. यामध्ये मुलींच्या संघात रत्नागिरीच्या आर्या डोर्लेकर हिची निवड झाली आहे.
संघाच्या निवडीसाठी तज्ज्ञ समिती नियुक्त करण्यात आली होती. कुमार गटात वैभव मोरे (ठाणे, कर्णधार), गणेश बोरकर, फराज शेख, कृष्णा बनसोडे (सर्व सोलापूर), चेतन बिका, तेजस जाधव, चेतन गुंडगीळ, भावेश मेश्रे (सर्व पुणे), रमेश वसावे, भरत वसावे, श्रीशंभू पेठे (धाराशिव), ओम पाटील (सांगली), रोहित गावित (नंदूरबार), हर्ष कामटेकर (मुंबई) या खेळाडूंचा समावेश आहे. प्रशिक्षक म्हणून प्रताप शेलार (ठाणे), सहायक प्रशिक्षक म्हणून संतोष कर्नाळे (सांगली), व्यवस्थापक राजेश सोनावणे (नंदूरबार) हे आहेत.
मुलींच्या गटात दीपाली राठोड (कर्णधार, ठाणे), अश्विनी शिंदे, सुहानी धोत्रे, संध्या सुरवसे, प्रणाली काळे (सर्व धाराशिव), सानिका चाफे, प्रतीक्षा बाराजदार, नयन काळे (सर्व सांगली), दिव्या गायकवाड, सान्वी तळवडेकर, तेजस्वी पाटेकर (सर्व ठाणे), पूर्वा वाघ (पुणे), सादिया मुल्ला (सोलापूर), साक्षी पारसेकर (मु. उपनगर), आर्या डोर्लेकर (रत्नागिरी) यांचा समावेश आहे. प्रशिक्षक म्हणून श्रीकांत गायकवाड (मुंबई), सहायक सुप्रिया गाढवे (धाराशिव), व्यवस्थापिका नंदिनी धुमाळ (मुंबई) या आहेत. रत्नागिरीच्या आर्या डाेर्लेकर हिला राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.