राज्यातील तब्बल ५९७ परिचारिकांच्या नोकरीवर गदा, रत्नागिरीतील १९ जणांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 04:23 PM2022-10-24T16:23:17+5:302022-10-24T16:23:57+5:30

ऐन दिवाळीत शासनाने हा निर्णय घेतल्याने उडाली खळबळ

As many as 597 nurses in the state will have to leave their jobs, Including 19 people from Ratnagiri | राज्यातील तब्बल ५९७ परिचारिकांच्या नोकरीवर गदा, रत्नागिरीतील १९ जणांचा समावेश

संग्रहित फोटो

googlenewsNext

रत्नागिरी : राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नेमलेल्या परिचारिकांना कमी करण्याचे आदेश केंद्र शासनाने घेतला आहे. ३१ ऑक्टोबरपासून त्यांना काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील तब्बल ५९७ परिचारिकांच्या नोकरीवर गदा आली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील १९ परिचारिकांना नाेकरी साेडावी लागणार आहे. ऐन दिवाळीत शासनाने हा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सध्या बिगर आदिवासी क्षेत्रात ३२०७ एएनएम पदे २०२२-२३ मध्ये प्रस्तावित करण्यात आली होती. त्याबाबतचा महाराष्ट्राच्या आरोग्य सेवा आयुक्त स्तरावरून तेवढीच पदे प्रस्तावित करणारा अंमलबजावणीचा आराखडा मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविला होता. त्यातील २ हजार ६१० पदांना मंजुरी मिळाली होती. त्यानुसार परिचारिकांना आरोग्य विभागाकडून नियुक्त्याही देण्यात आल्या आहेत.

मागील वर्षांत एकही बाळंतपण न झालेल्या उपकेंद्रातील परिचारिका पदे रद्द करावीत, ज्यांचे काम असमाधानकारक आहे, अशांना कमी करावे. ज्यांची सेवा कमी झाली आहे (सेवा ज्येष्ठतेनुसार) त्यांना कमी करावे, असे केंद्र शासनाने म्हटले आहे. मागील वर्षीही परिचारिका सेवा समाप्त करण्याची कार्यवाही करण्यात आली होती; परंतु अचानक दिलेले आदेश रद्द करून त्यांची सेवा समाप्त करू नये असे नव्याने आदेश काढण्यात आले होते.

पण यावर्षी केंद्राकडून राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तब्बल ५९७ परिचारिकांची नोकरी ३१ ऑक्टोबरपासून समाप्तीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाला दिले आहेत. या आदेशामुळे रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या १९ परिचारिकांना कमी करण्यात येणार आहे. परिचारिकांना कमी करण्याच्या आदेशामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: As many as 597 nurses in the state will have to leave their jobs, Including 19 people from Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.