विधानसभेचे विशेष अधिवेशन संपताच आमदार भास्कर जाधव गावी रमले शेती कामात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 05:29 PM2022-07-06T17:29:19+5:302022-07-06T17:40:06+5:30

समाजकारण व राजकारणात कितीही मोठ्या पदावर पोहोचले तरी भास्कर जाधव यांनी गावाकडची नाळ तोडली नाही

As soon as the special session of the Legislative Assembly came to an end, MLA Bhaskar Jadhav started farming | विधानसभेचे विशेष अधिवेशन संपताच आमदार भास्कर जाधव गावी रमले शेती कामात

विधानसभेचे विशेष अधिवेशन संपताच आमदार भास्कर जाधव गावी रमले शेती कामात

googlenewsNext

संदीप बांद्रे

चिपळूण : विधानसभेचे विशेष अधिवेशन संपताच कोकणातील शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हे त्यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव या गावी कुटुंबासह शेतीमध्ये रमले आहेत. आमदार जाधव यांचे एकत्र कुटुंब असून दरवर्षी भात, नाचणी, मका यासह विविध प्रकारची कडधान्ये, भाजीपाला लागवड ते करतात.

समाजकारण व राजकारणात कितीही मोठ्या पदावर पोहोचले तरी भास्कर जाधव यांनी गावाकडची नाळ तोडली नाही. ते सुगीच्या दिवसात स्वत: शेतातील कामे करतात. दरवर्षी न चुकता ते शेतामध्ये उतरतात. पॉवर टिलरने शेती नांगरून सर्व प्रकारच्या कामांना मोठा हातभार लावतात. आपल्याच शेतात कष्ट करून पिकवलेलं धान्य आपल्याला वर्षभर पुरतं असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.



काही वर्षांपूर्वीच त्यांच्या पायाची घोटशीर तुटली होती आणि त्यानंतर काही दिवस ते चालू शकले नव्हते. परंतु, त्यावर त्यांनी मात केली. एकाच पायावर दोनदा शस्त्रक्रिया झाल्यानंतरही ते पूर्वीसारखेच उत्साहाने शेतीच्या कामात झोकून देताना पहावयास मिळाले.

Web Title: As soon as the special session of the Legislative Assembly came to an end, MLA Bhaskar Jadhav started farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.