रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांना मुलासह अटक

By मनोज मुळ्ये | Published: April 28, 2023 12:40 PM2023-04-28T12:40:11+5:302023-04-28T12:41:16+5:30

जमावबंदी आदेश माेडल्याच्या आराेपावरुन केली अटक

Ashok Valam, President of Anti Refinery Struggle Committee arrested along with his son | रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांना मुलासह अटक

रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांना मुलासह अटक

googlenewsNext

राजापूर :  जमावबंदी आदेश माेडल्याच्या आराेपावरून रिफायनरी विराेधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशाेक वालम आणि त्यांचा मुलगा विनेश वालम या दाेघांना पाेलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा अटक केली आहे. या अटकेच्या कारवाईमुळे रिफायनरी विराेधकांमध्ये जाेरदार चर्चा सुरु झाली आहे.

या आधी नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प उभारणी संदर्भातील हालचाली सुरु असताना अशाेक वालम यांच्या नेतृत्वाखाली रिफायनरी विराेधाचा लढा उभारण्यात आला हाेता. बारसू येथेही हा प्रकल्प हाेऊ नये यासाठी वालम यांनी पुढाकार घेतला आहे. आता बारसू येथील जमावबंदी आदेश माेडल्याच्या आराेपावरुन त्यांना तसेच त्यांचा मुलगा विनेश यांना अटक झाली आहे. अटक केल्यानंतर त्यांना रत्नागिरीमध्ये नेण्यात  नेण्यात आले. आज त्यांना रत्नागिरीच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

वालम यांनी बळी राज सेना नावाचा पक्ष गेल्या आठवड्यातच स्थापन केला असून रिफायनरी विराेध हा या पक्षाचा प्रमुख अजेंडा आहे.

Web Title: Ashok Valam, President of Anti Refinery Struggle Committee arrested along with his son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.