रस्त्याचे डांबरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:27 AM2021-04-03T04:27:25+5:302021-04-03T04:27:25+5:30
दापोली : गेली कित्येक वर्षे दुर्लक्षित असलेला दाभोळ ते उसगाव दरम्यानचा रस्ता खड्डेमय झाला होता. मात्र आता या रस्त्याचे ...
दापोली : गेली कित्येक वर्षे दुर्लक्षित असलेला दाभोळ ते उसगाव दरम्यानचा रस्ता खड्डेमय झाला होता. मात्र आता या रस्त्याचे डांबरीकरण होणार आहे. यासाठी आमदार योगेश कदम यांनी निधी मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे आता लवकरच या रस्त्याची दुरुस्ती होऊन ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार आहे.
विविध उपक्रम
मंडणगड : देव्हारे पंचक्रोशी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविले आहेत. या शाळेतील मुलांचा बौद्धिक आणि शारीरिक विकास होण्याच्या दृष्टीने निबंध, कबड्डी आणि क्रिकेट अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
उष्म्याने नागरिक हैराण
लांजा : गेल्या काही दिवसांपासून उष्म्यात वाढ होऊ लागली आहे. सकाळी ८ वाजल्यापासूनच उन्हाचा कडाका वाढायला सुरुवात होते. दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा असह्य होत असल्याने नागरिकांना बाहेर पडणे असह्य होते. त्यामुळे दुपारच्या वेळेत सर्वत्र शुकशुकाट दिसत असतो.
पाण्याचे स्रोत आटले
मंडणगड : तालुक्यात आता उष्णता मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्म्यात प्रचंड वाढ होत असल्याने नैसर्गिक पाण्याचे स्रोत आता आटू लागले आहेत. तालुक्यात दुर्गम भागात पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. त्यामुळे महिलावर्ग पायपीट करीत पिण्याचे पाणी आणत आहे.
परिचारिकांचे निवेदन
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या अंशकालीन परिचारिकांनी प्रलंबित मागण्यांचे निवेदन शासनाकडे सादर केले आहे. त्याचबरोबर चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनाही निवेदन दिले आहे. या परिचारिकांच्या महत्त्वाच्या पाच मागण्या अनेक वर्षांपासून संघर्ष करूनही प्रलंबित आहेत.