कॅरम टेस्ट सिरीजच्या भारतीय संघात आकांक्षा कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 05:29 PM2019-09-19T17:29:32+5:302019-09-19T17:31:28+5:30
रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनची खेळाडू आकांक्षा उदय कदम हिची ५ ते १२ आॅक्टोबर २०१९ या कालावधीत मालदिव येथे होणाऱ्या भारत-मालदिव कॅरम टेस्ट सिरीज साठी भारताच्या कुमारी गट संघात निवड झाली आहे. या वर्षासाठी तिला एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडिया स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डची शिष्यवृत्तीही जाहीर झाली आहे.
रत्नागिरी : जिल्हा कॅरम असोसिएशनची खेळाडू आकांक्षा उदय कदम हिची ५ ते १२ आॅक्टोबर २०१९ या कालावधीत मालदिव येथे होणाऱ्या भारत-मालदिव कॅरम टेस्ट सिरीज साठी भारताच्या कुमारी गट संघात निवड झाली आहे. या वर्षासाठी तिला एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडिया स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डची शिष्यवृत्तीही जाहीर झाली आहे.
मूळ देवडे (ता. संगमेश्वर) गावची कन्या असलेली आकांक्षा कदम सध्या रा. भा. शिर्के प्रशालेत नववी इयत्तेत शिकत आहे. तिला तिचे मामा, शिव छत्रपती पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू संदीप देवरूखकर, राज्य कॅरम असोसिएशनचे मानद सचिव, शिव छत्रपती पुुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू अरूण केदार, रा. भा. शिर्के प्रशालेचे क्रीडा शिक्षक विनोद मयेकर यांचे मार्गदर्र्शन लाभले.
या कामगिरीबद्दल म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत, सह्याद्री शिक्षण संस्थेचे शेखर निकम, रोहन बने, जिल्हा कॅरम असोसिएशनचे सल्लागार सुचय
रेडीज, अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, सचिव मिलिंद
साप्ते यांनी तिचे अभिनंदन केले आहे.