फिनोलेक्स, मुकुल माधव फाऊंडेशनतर्फे कोरोना विलगीकरण कक्षासाठी मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:21 AM2021-07-09T04:21:10+5:302021-07-09T04:21:10+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्याकरिता जिल्हा प्रशासनाने गावागावात विलगीकरण कक्ष सुरू करण्याच्या सूचना ...

Assistance for Corona Separation Room by Finolex, Mukul Madhav Foundation | फिनोलेक्स, मुकुल माधव फाऊंडेशनतर्फे कोरोना विलगीकरण कक्षासाठी मदत

फिनोलेक्स, मुकुल माधव फाऊंडेशनतर्फे कोरोना विलगीकरण कक्षासाठी मदत

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्याकरिता जिल्हा प्रशासनाने गावागावात विलगीकरण कक्ष सुरू करण्याच्या सूचना केली आहे. त्यानंतर फिनोलेक्स इंडस्ट्रीज व सीएसआर पार्टनर मुकुल माधव फाऊंडेशनने आसपासच्या दहा ग्रामपंचायतींना या कक्षासाठी अत्यावश्यक वस्तूंचे वाटप केले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या हस्ते कंपनी परिसरातील भाट्ये, फणसोप, कोळंबे, गोळप, पावस, पूर्णगड, मेर्वी, गणेशगुळे, गावखडी आणि शिरगाव ग्रामपंचायतींना ही सामग्री वितरीत करण्यात आली. कोविडशी लढा देताना फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊंडेशनने जिल्हा प्रशासनाला कोविड काळात १६ सुसज्ज आयसीयू बेड, सलाईन स्टॅण्ड, मल्टीपॅरा मॉनिटर, व्हेंटिलेटर, पीपीई किट्स आणि एचएफएनओ मशीन आणि १७ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले आहेत.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले की, जिल्ह्यात आता बाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. पण ज्यांना लक्षणे दिसत आहेत, त्यांनी तत्काळ तपासणी करून घ्यावी म्हणजे उपचार सुरू होऊन बरे होता येईल. याकरिता गावागावांत विलगीकरण कक्ष सुरू केले आहेत. याकरिता फिनोलेक्सने केलेली मदत माेलाची आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणाऱ्या डॉ. इंदुराणी जाखड यांनी मुकुल माधव फाऊंडेशनने कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी केलेल्या मदतीबद्दल भरभरून कौतुक केले. मुकुल माधव फाऊंडेशनच्या विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांचे आभार मानले.

Web Title: Assistance for Corona Separation Room by Finolex, Mukul Madhav Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.