डाऊ केमिकल्सकडून पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:38 AM2021-07-07T04:38:28+5:302021-07-07T04:38:28+5:30
चिपळूण : कोरोनाकाळात सामाजिक उपक्रमांत पुढाकार घेणाऱ्या लोटे औद्योगिक वसाहतीतील डाऊ केमिकल्स या कंपनीने चिपळूण तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य ...
चिपळूण : कोरोनाकाळात सामाजिक उपक्रमांत पुढाकार घेणाऱ्या लोटे औद्योगिक वसाहतीतील डाऊ केमिकल्स या कंपनीने चिपळूण तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही मदतीचा हात दिला आहे. रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या गाद्या आणि उशा या केंद्रांना भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
अडरे, शिरगाव, दादर, रामपूर आणि कापरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना हे साहित्य देण्यात आले. कंपनीच्या सीएसआर कमिटीचे सदस्य मानसिंग यादव आणि विनायक गोंधळी यांनी कंपनीतर्फे हे साहित्य आरोग्य केंद्रांकडे देण्यात आले. डॉ. यतीन मयेकर, डॉ. अंकुश यादव या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हे साहित्य स्वीकारले. कापरे येथील कार्यक्रमाला करंबवणे ग्रामपंचायतीचे सदस्य, वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश यादव, आरोग्य सहायक, आरोग्य सेवक जाधव उपस्थित होते.
----------------------------------
चिपळूण तालुक्यातील कापरे प्राथमिक आराेग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश यादव यांच्याकडे सीएसआर कमिटीचे सदस्य विनायक गोंधळी यांच्या हस्ते साहित्य देण्यात आले.
050721\1432-img-20210705-wa0004.jpg
डाऊ केमिकल्सकडून पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांना मदत केली.