मुंबईतील श्रीराम ग्रामोत्कर्ष संघातर्फे पूरग्रस्तांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:36 AM2021-08-12T04:36:06+5:302021-08-12T04:36:06+5:30
चिपळूण : तालुक्यातील पूरग्रस्त ग्रामस्थांना मुंबईतील श्रीराम ग्रामोत्कर्ष संघांना कर्तव्य कार्य सेवा म्हणून मदत देण्यात आली. चिपळूण शहरात झालेल्या ...
चिपळूण : तालुक्यातील पूरग्रस्त ग्रामस्थांना मुंबईतील श्रीराम ग्रामोत्कर्ष संघांना कर्तव्य कार्य सेवा म्हणून मदत देण्यात आली.
चिपळूण शहरात झालेल्या अतिवृष्टीत व आलेल्या महापुरामुळे मौजे मोरवणे बुद्रुक येथील चिपळूण, बहादूर शेख नाका, खेर्डी व कळंबस्ते या परिसरात वास्तव्यास असलेल्या ग्रामस्थांना ही मदत देण्यात आली. तसेच मौजे मोरवणे बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक अशा ३९ पूरग्रस्त ग्रामस्थांना अत्यावश्यक धान्य व वस्तूंचे कर्तव्यकार्य सेवा म्हणून वितरण करण्यात आले.
यावेळी संघाचे अध्यक्ष विश्वास विचारे यांच्यासह कार्याध्यक्ष अरविंद शिंदे,\I सरचिटणीस रवींद्र शिंदे, उपाध्यक्ष रवींद्र शिंदे,\I सदस्य संदीप शिंदे, प्रकाश शिंदे, अमित शिंदे, प्रशांत शिंदे व प्रमोद शिंदे, मौजे मोरवणे बुद्रुक येथील स्थानिक ग्रामस्थ गणपत शिंदे, प्रकाश शिंदे, प्रमोद शिंदे, पांडुरंग पिलावरे, सुनील विचारे, संतोष शिंदे, जयवंत शिंदे, अमोल अनंत उंडरे उपस्थित होते.