डीजीके महाविद्यालयात दत्तक पालक योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:37 AM2021-09-24T04:37:30+5:302021-09-24T04:37:30+5:30

रत्नागिरी : येथील भारत शिक्षण मंडळ देव-घैसास-कीर वरिष्ठ महाविद्यालयात २३ सप्टेंबर रोजी दत्तक पालक योजनेंतर्गत गरीब व गरजू विद्यार्थिनींना ...

Assistance to students under the adoptive parent scheme in DGK College | डीजीके महाविद्यालयात दत्तक पालक योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना मदत

डीजीके महाविद्यालयात दत्तक पालक योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना मदत

Next

रत्नागिरी : येथील भारत शिक्षण मंडळ देव-घैसास-कीर वरिष्ठ महाविद्यालयात २३ सप्टेंबर रोजी दत्तक पालक योजनेंतर्गत गरीब व गरजू विद्यार्थिनींना मदत करण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव सुनील उर्फ दादा वणजू, उपकार्याध्यक्ष श्रीराम भावे, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील, ग्रंथपाल साईप्रसाद पवार, इतर प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमात संस्थेचे सचिव सुनील उर्फ दादा वणजू, श्रीराम भावे यांनी महाविद्यालयाच्या या उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या. प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील यांनी देणगीदारांचे आभार मानले व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ज्या विद्यार्थिनींनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांनी भविष्यात अशा विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन त्यांनी केले.

सूत्रसंचालन निलोफर बन्नीकोप यांनी केले. या उपक्रमासाठी शैलेश जाधव ( कोसुंब), अथर्व मराठे (लांजा), रवींद्र इनामदार (रत्नागिरी), विजय पाटील (मुंबई) यांनी देणगी दिली.

.......

फोटो मजकूर

रत्नागिरीतील भारत शिक्षण मंडळ देव-घैसास-कीर वरिष्ठ महाविद्यालयात २३ रोजी दत्तक पालक योजनेंतर्गत गरीब व गरजू विद्यार्थिनींना मदत करण्यात आली. संस्थेचे सचिव सुनील उर्फ दादा वणजू यांच्या हस्ते ही मदत देण्यात आली. यावेळी उपकार्याध्यक्ष श्रीराम भावे, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य मधुरा पाटील उपस्थित होते.

Web Title: Assistance to students under the adoptive parent scheme in DGK College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.