तृतीयपंथी यांच्या मदतीला ‘आस्था’ धावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:23 AM2021-06-25T04:23:06+5:302021-06-25T04:23:06+5:30

रत्नागिरी : समाजाने ज्यांना उपेक्षित ठरविले अशा तृतीयपंथींची कोरोना काळात उपासमार होत असतानाच येथील आस्था सोशल फाउंडेशन त्यांच्या मदतीला ...

‘Astha’ ran to the aid of the third party | तृतीयपंथी यांच्या मदतीला ‘आस्था’ धावली

तृतीयपंथी यांच्या मदतीला ‘आस्था’ धावली

googlenewsNext

रत्नागिरी : समाजाने ज्यांना उपेक्षित ठरविले अशा तृतीयपंथींची कोरोना काळात उपासमार होत असतानाच येथील आस्था सोशल फाउंडेशन त्यांच्या मदतीला धावून गेली आहे. या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येकी १००० रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू या व्यक्तींना देण्यात आल्या.

आस्था सोशल फाउंडेशन, रत्नागिरी ही संस्था मागील बारा वर्षे दिव्यांगांसाठी कार्यरत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देखील आस्थाचे कार्य चालूच आहे. दिव्यांगांप्रमाणेच समाजातील अत्यंत दुर्लक्षित व वंचित घटक म्हणजे तृतीयपंथी, दुर्दैवाने कोरोनाच्या आव्हानात्मक काळात देखील शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत या वर्गाला झाली नाही. सन्मानाने जगण्याची इच्छा असूनही कोणीही काम देत नाही, बँका कर्ज देत नाही, राहण्यासाठी हक्काचे घर नाही, समाजाकडून तुच्छ वागणूक मिळते, त्यामुळे नाइलाजाने “मंगती” करून लाचारीचे जगणे जगावे लगत आहे. महिला धोरणात, शासन निर्णयात तृतीयपंथी यांच्या कल्याणाबाबत शासनाकडून सूचना असून देखील प्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत काहीच पोहचत नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील तृतीयपंथी यांचे नेतृत्व करणारी पल्लवी शर्मिला माने यांना आस्थाच्या प्रयत्नाने जिल्हास्तरीय दिव्यांग सुलभ निवडणूक सनियंत्रण समितीवर घेण्यात आले. सर्वांचे ओळखपत्र तयार करून त्यात तृतीयपंथी (Third Gender) अशी ओळख अद्ययावत करण्यात आली आणि इथूनच त्यांचा हक्क मिळविण्याचा प्रवास सुरू झाला आहे.

कोरोना काळात रेल्वे, आठवडा बाजार, बाजारपेठ बंद असल्यामुळे अतिशय बिकट परिस्थितीत असलेल्या या तृतीयपंथींना आस्थाच्या माध्यमातून गुरुवारी प्रधान टी यांच्याकडून किराणा सामानाचे किट व देणगीदार कृपाली बिडये यांच्याकडून प्रत्येकी १००० रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू पल्लवी माने, महेश्वरी लोहार, अक्षय शेट्ये, प्रमोद तांबे यांना देण्यात आल्या.

यावेळी आस्थाच्या सुरेखा पाथरे, संकेत चाळके, कल्पेश साखरकर, संपदा कांबळे तसेच प्रधान टीच्या वतीने खतिजा प्रधान, श्रुती बागवे आदी उपस्थित होते.

Web Title: ‘Astha’ ran to the aid of the third party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.