असुर्डे : सत्तेची मस्ती आलेल्या सरकारला आंबेडकरी जनता माफ करणार नाही - जयदेव गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 05:16 PM2018-09-29T17:16:37+5:302018-09-29T17:20:49+5:30
अच्छे दिन च्या नावाखाली जनतेची फसवणूक करुन देश पर्यायाने राज्य देशोधडीला लावणाऱ्या व सत्तेची मस्ती आलेल्या राज्य आणि केंद्र शासनाला आंबेडकरी जनता माफ करणार नाही,
असुर्डे : अच्छे दिन च्या नावाखाली जनतेची फसवणूक करुन देश पर्यायाने राज्य देशोधडीला लावणाऱ्या व सत्तेची मस्ती आलेल्या राज्य आणि केंद्र शासनाला आंबेडकरी जनता माफ करणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयदेव गायकवाड यांनी सावर्डे येथे पत्रकार परिषदेत दिला.
आंबेडकरी जनतेत केवळ आपल्या स्वार्थासाठी उभी फुट पाडणाऱ्या रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर यांची क्रेझ संपली आहे.
आंबेडकरी जनता यांना कंटाळले आहे. प्रकाश आंबेडकराचा महाराष्ट्रात केवळ एकच आमदार आहे. आठवलेंनी आपल्या मंत्रीपदासाठी रिपब्लिकन पक्ष मोदींच्या दावणीला बांधला. महाराष्ट्रात त्याचा एकही आमदार नाही. यामध्ये आंबेडकरी जनतेची मोठी फरफटझाली. आठवले व प्रकाश आंबेडकर यांनी विश्वासार्हता गमावली आहे. आठवले जनतेला भाजपकडे न्यायला लागलेत पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर असते तर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला असता. मनुस्मृतीचा पुरस्कार करणाऱ्या भाजपबरोबर आंबेडकर जनतेने जावे का? भाजप हा हिंदूत्ववादी फॅसिस्ट पक्ष आहे. आंबेडकरवादी सामान्य माणूस कधीही भाजपलापाठिंबा देणार नाही. की मतदान करणार नाही, असे ते म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघ पक्षाचे रजिस्ट्रेशन करणारा मी कार्यकर्ता आहे. चळवळ पुढे गेलीच नाही. आमच्या आयुष्यातील अठरा वर्षे वाया गेलीत. अशा चळवळीत यश मिळत नसेल तर टाचा घासत बसण्यात काही अर्थ नाही. प्रकाश आंबेडकरांनी कॉग्रेस सारख्या पक्षाचा स्विकार केला असता तर लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले असते. आता आंबेडकर जनता ठप्प आहे. एमआयएमला पाठिंबा दिल्या पासून आंबेडकरी जनता प्रकाश आंबेडकरांच्या पासून दूर जावू लागली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षच आंबेडकर जनतेला न्याय देवू शकतो असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.