आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय पारितोषिक वितरण समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:28 AM2021-04-03T04:28:16+5:302021-04-03T04:28:16+5:30
बारावी कला शाखेतून प्रथम आलेल्या रिया राजेश सावंत हिला प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. लाेकमत ...
बारावी कला शाखेतून प्रथम आलेल्या रिया राजेश सावंत हिला प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवरुख : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाचा शैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या समारंभात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच सहशैक्षणिक यशाचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून देवरूख नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष सुशांत मुळ्ये उपस्थित हाेते. यावेळी व्यासपीठावर संस्था उपाध्यक्ष प्रा. पांडुरंग भिडे, कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र राजवाडे, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी केले. प्रा. सुवर्णा साळवी यांनी शैक्षणिक बक्षिसांचे वाचन केले. विविध स्पर्धांच्या पारितोषिकांचे वाचन प्रा. सीमा शेट्ये यांनी केले. विद्यार्थिनी साक्षी गवंडी हिने मनोगत व्यक्त केले. सुशांत मुळ्ये यांनी विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला. यावेळी राजेंद्र राजवाडे, प्रा. भिडे यांनीही मनाेगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. सीमा शेट्ये यांनी केले तर प्रा. एम. आर. लुंगसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.