आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाला रत्नागिरी दक्षिण झोनचे उपविजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:29 AM2021-04-06T04:29:51+5:302021-04-06T04:29:51+5:30

देवरुख : ५३ व्या मुंबई विद्यापीठाच्या ‘युवा महोत्सव-२०२१’मध्ये देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाने झोनल राऊंडमध्ये १० स्पर्धांपैकी ८ ...

Athalye-Sapre-Pitre College won the runner-up position of Ratnagiri South Zone | आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाला रत्नागिरी दक्षिण झोनचे उपविजेतेपद

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाला रत्नागिरी दक्षिण झोनचे उपविजेतेपद

googlenewsNext

देवरुख : ५३ व्या मुंबई विद्यापीठाच्या ‘युवा महोत्सव-२०२१’मध्ये देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाने झोनल राऊंडमध्ये १० स्पर्धांपैकी ८ स्पर्धांमध्ये पाच पारितोषिके प्राप्त करून रत्नागिरी दक्षिण झोनचे उपविजेतेपद प्राप्त केले.

या महाेत्सवातील पोस्टर मेकिंग स्पर्धेतील प्रथम क्रमांक अक्षय वहाळकर, ऑन दी स्पॉट पेंटिंगमध्ये द्वितीय क्रमांक अक्षय वहाळकर, वक्तृत्व स्पर्धेत सायली महाडिक, एकपात्री अभिनयमध्ये प्रशंसा डाऊल, कथाकथनमध्ये तनुजा शिवतरकर यांनी यश मिळवले आहे. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक विजय आंबवकर, विष्णू परिट, सुरज मोहिते, विलास रहाटे, प्रभाकर डाऊल, प्रा. डॉ. वर्षा फाटक, प्रा. डॉ. मधुकर मगदूम, प्रा. अरविंद कुलकर्णी, प्रा. धनंजय दळवी, प्रा. डॉ. प्रताप नाईकवाडे, अजिंक्य नाफडे, पूनम भोपळकर, प्रज्ञा शिंदे यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. महाविद्यालयाला उपविजेतेपद मिळवून देणाऱ्या या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक प्राध्यापकांचे संस्था तसेच महाविद्यालयातर्फे अभिनंदन करण्यात आले.

Web Title: Athalye-Sapre-Pitre College won the runner-up position of Ratnagiri South Zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.