अॅथलेटिक्सला ‘टॉप फोर’मध्ये स्थान मिळावे
By admin | Published: December 24, 2016 11:31 PM2016-12-24T23:31:06+5:302016-12-24T23:31:06+5:30
रशियातील डोपिंग प्रकरणाच्या संकटावर मात करीत अॅथ्लेटिक्सचा समावेश पुढील तीन वर्षांत पहिल्या चार खेळांत व्हावा, अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय अॅथ्लेटिक्स फेडरेशनचे अध्यक्ष
रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयातील विविध गंभीर गैरसोयीबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक बी. आर. अडसूळकर हे मौन बाळगत आहे. त्यांचे रुग्णालयाकडे लक्षच नसल्याचे कळताच आमदार उदय सामंत यांनी शनिवारी जिल्हा रुग्णालयात धडक मारली. यावेळी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना चांगलेच धारेवर धरले. तसेच तत्काळ आरोग्य संचालकांकडे याबाबत तक्रार करून अशा शल्यचिकित्सकांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी केली. याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन आरोग्य संचालकांनी सामंत यांना दिले.
जिल्हा रुग्णालयातील सेवेचा गेल्या काही महिन्यांत बट्ट्याबोळ उडाला आहे. रुग्णालयात विजेची व्यवस्थित सुविधा नाही. काही दिवसांपूर्वी तर रुग्णांना टाके घालताना मोबाईलच्या प्रकाशात घालावे लागले होते. हा संतापजनक प्रकार व्हॉटस्अॅपवरून व्हायरल झाल्यानंतर एकच संताप व्यक्त होत होता.
आमदार उदय सामंत यांना याबाबत माहिती कळताच त्यांनी शनिवारी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी या गैरसोयींबाबत शल्यचिकित्सक अडसूळकर यांना त्यांनी धारेवर धरले. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांशीही त्यांनी चर्चा केली.
या सर्व गैरसोयीबद्दल आणि त्याला जबाबदार असणाऱ्या जिल्हा शल्यचिकित्सकांबाबत त्यांनी दूरध्वनीद्वारे आरोग्य संचालकांकडे तक्रार केली. अडसूळकर यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे आणि त्यांचा कार्यभार डॉ. प्रल्हाद देवकर यांच्याकडे देण्यात यावा, अशी आग्रही मागणी सामंत यांनी केली. यावेळी याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आरोग्य संचालकांनी सामंत यांना सांगितले.
जिल्हा रुग्णालयात विजेची गैरसोय आहे. तसेच गटारेही उघडी असल्याने परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी सामंत यांनी चर्चा केली. त्यानंतर सोमवारपासून या कामांना सुरुवात करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सामंत यांना सांगितले. (प्रतिनिधी)
फोन उद्या सुरू असायला हवेत...
जिल्हा रुग्णालयात असलेल्या पोलिस चौकीचा फोन सध्या अपघात विभागात ठेवण्यात आला आहे. ही माहिती कळताच सामंत संतप्त झाले. त्यांनी तो फोन पहिल्यांदा होता तेथे ठेवा, असे ठणकावले आणि अपघात विभागात नवीन फोन आणा, असे सांगितले. जिल्हा रुग्णालयातील सर्व दूरध्वनी सोमवारी सुरू असले पाहिजेत, असे सामंत यांनी सांगितले.