रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 08:08 PM2020-10-22T20:08:33+5:302020-10-22T20:10:40+5:30
collector, Police, suicide, ratnagirinews शासनाच्या कारभाराला कंटाळून एका व्यक्तीने गुरूवारी सकाळी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याला रोखण्यात आले.
रत्नागिरी : शासनाच्या कारभाराला कंटाळून एका व्यक्तीने गुरूवारी सकाळी रत्नागिरीजिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याला रोखण्यात आले.
आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव सुर्वे असे असून, तो रत्नागिरी शहरातील गवळीवाडा येथील राहणारा असल्याचे सांगण्यात येत आहे. शासनाकडून आपल्याला न्याय मिळत नसल्याचे त्याने सांगितले.
सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात त्याने रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच आजूबाजूच्या लोकांनी त्याला प्रकारापासून परावृत्त केले. त्याच्याजवळ न फोडलेली विषाची बाटली असल्याचे कळते.
या प्रकारामुळे खळबळ उडाली असून कर्मचाऱ्यांनी गर्दी केली आहे. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असून, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्याने हा प्रकार करण्यामागचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.