थकीत भाड्याबाबत सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष

By admin | Published: August 31, 2014 10:32 PM2014-08-31T22:32:34+5:302014-08-31T23:35:20+5:30

शहरवासीयांत उत्सुकता : या प्रश्नावर विरोधक काय करणार

Attention to the role of power in the tired fares | थकीत भाड्याबाबत सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष

थकीत भाड्याबाबत सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष

Next

चिपळूण : नगरपरिषद हद्दीतील कन्याशाळा, पाग मुलांची शाळा, पेठमाप मराठी उर्दू शाळा, चिंचनाका नं. १ या शाळा जिल्हा परिषदेला भाडेत्तत्वावर देण्यात आल्या आहेत. मात्र, मार्चअखेर या शाळांचे २२ लाख ७६ हजार ३७१ रुपये थकीत भाडे असल्याने हे भाडे वसूल कसे करता येईल, याबाबतच्या प्रस्तावावर उद्या (सोमवारी) होणाऱ्या विशेष सभेत चर्चा होणार आहे. यासंदर्भात सत्ताधारी व विरोधक कोणती भूमिका घेणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
नगर परिषदेच्या श्रावणशेठ दळी सभागृहात सायंकाळी ४ वाजता नगराध्यक्ष सावित्री होमकळस यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा होणार आहे. या सभेमध्ये विविध ३४ विषयांवर चर्चा होणार आहे. नगर परिषद हद्दीतील स्ट्रीट लाईट देखभाल दुरुस्तीसाठी २०१४-१५ या वर्षाकरिता ६ विद्युत कर्मचारी ठेकेदार पद्धतीने घेण्यात येणार आहेत. याबाबत अंदाजपत्रकीय दरापेक्षा ८.९८ टक्के जादा दराच्या निविदेस आर्थिक व प्रशासकीय मंजुरी देण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
नगरपरिषद हद्दीतील खेंड, बाजारपेठ, उक्ताड, पेठमाप, गोवळकोट येथील घनकचरा व्यवस्थापन सेवा पुरविण्याचे काम तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात येते. याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र, निधी शिल्लक नसल्याने ७६ लाख ७६ हजार ७६० रुपये खर्चास नगर परिषद फंडातून प्रशासकीय व आर्थिक मंजुरी देण्याबाबत आलेल्या रिपोर्टवर निर्णय घेण्यात येणार आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६चे चौपदरीकरण केले जाणार आहे. नगरपरिषद हद्दीतून हा रस्ता जात असल्याने यासंदर्भात सहायक मिळकत व्यवस्थापक यांच्या रिपोर्टमधील नमूद बाबींवर या सभेत चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे. प्रभाक क्र. १ मधील शंकरवाडी येथे गणेशघाट येथील पाखाडीचे काम करण्यासाठी अंदाजपत्रकीय रक्कम ३ लाख ७ हजार ५२० रुपयांचा खर्च मागासवर्गीय विशेष कल्याण समिती निधीतून करण्याचा ठराव करण्यात आला असून, या खर्चास प्रशासकीय व आर्थिक मंजुरी घेण्याबाबत चर्चा केली जाणार आहे.
गोवळकोट भागामध्ये बायपास येथे बांधलेल्या नवीन टाकीतून पाण्याचे वितरण करण्यासाठी एन्रॉन ब्रीज (करंजेश्वरी कमानी) पर्यंत ३०० एमएम व्यासाची पाईपलाईन टाकण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरण यांच्याकडून कामाचे अंदाजपत्रक करुन घेण्यात आले आहे. यासाठी येणाऱ्या १ कोटी ८१ लाख ३८ हजार २९० रुपये खर्चाला आर्थिक व प्रशासकीय मंजुरी घेतली जाणार आहे. शहरातील नवीन बाजारपुलाचे काम सुरु करण्यात येणार असल्याने जुनी पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी येणाऱ्या ६ लाख २५ हजार २७८ च्या खर्चास प्रशासकीय आर्थिक मंजुरी घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे गोवळकोट येथील ३०० एमएम १५० मीटर व्यासाची पाईपलाईन काढून नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, त्यासाठी १० लाख ३७ हजार ४०२ रुपयास आर्थिक व प्रशासकीय मंजुरी घेण्याबाबत चर्चा केली जाणार आहे. ( वार्ताहर)

Web Title: Attention to the role of power in the tired fares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.