दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव; खेड मधील ग्रामस्थाने १.१० कोटींना विकत घेतली जागा

By मोरेश्वर येरम | Published: December 2, 2020 11:54 AM2020-12-02T11:54:50+5:302020-12-02T11:56:48+5:30

दाऊदच्या रत्नागिरीतील मालमत्तेचा ऑनलाइन लिलाव मंगळवारी मुंबईत पार पडला यात रवींद्र काते यांनी सर्वाधिक बोली लावली. 

Auction of dawood ibrahim property in ratnagiri Villager in Khed bought land for Rs 1.10 crore | दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव; खेड मधील ग्रामस्थाने १.१० कोटींना विकत घेतली जागा

दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव; खेड मधील ग्रामस्थाने १.१० कोटींना विकत घेतली जागा

googlenewsNext
ठळक मुद्देदाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीतील जागेचा लिलावग्रामस्थ रवींद्र काते यांनी लावली सर्वाधिक बोलीतब्बल १ कोटी १० लाखांना विकली गेली दाऊदची जमीन

रत्नागिरी
कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमच्या रत्नागिरी येथील मालमत्तेचा अखेर लिलाव करण्यात आला आहे. स्थानिक ग्रामस्थ रवींद्र काते यांनी सर्वाधिक बोली लावून ही जमीन खरेदी केली आहे. रवींद्र काते यांनी तब्बल १ कोटी १० लाखांना दाऊदची मालमत्ता खरेदी केली आहे. दाऊदच्या रत्नागिरीतील मालमत्तेचा ऑनलाइन लिलाव मंगळवारी मुंबईत पार पडला यात रवींद्र काते यांनी सर्वाधिक बोली लावली. 

स्मगलिंक अँड फॉरन एक्स्जेंज मॅनिप्युलेट आणि केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी या जागेची पाहणी केली होती. त्यानंतर या जागेची किंमत १ कोटी ९ लाखांच्या घरात निश्चित करण्यात आली होती. याआधी १० नोव्हेंबरला दाऊदच्या सात पैकी सहा जागांचा लिलाव झाला होता. पण रत्नागिरीतील जागेचा लिलाव होणं शिल्लक होतं. अखेर १ डिसेंबर रोजी या जागेचा लिलाव करण्यात आला आहे. याआधी दाऊदची रत्नागिरीतील हवेली अवघ्या ११ लाख २० हजार रुपयांना विकण्यात आली होती.  

Web Title: Auction of dawood ibrahim property in ratnagiri Villager in Khed bought land for Rs 1.10 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.