अकरावी सीईटी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्जाची उपलब्धता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:22 AM2021-07-21T04:22:11+5:302021-07-21T04:22:11+5:30

रत्नागिरी : अकरावी सीईटी परीक्षेची वेळ जाहीर झाली असून दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते १ ...

Availability of online application for Eleventh CET Exam | अकरावी सीईटी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्जाची उपलब्धता

अकरावी सीईटी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्जाची उपलब्धता

googlenewsNext

रत्नागिरी : अकरावी सीईटी परीक्षेची वेळ जाहीर झाली असून दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते १ या कालावधीत ही परीक्षा राज्यभरात एकाच दिवशी, एकाचवेळी होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी मंगळवारपासून ऑनलाईन अर्ज उपलब्ध करण्यात आले असून, दि. २६ जुलैपर्यंत परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.

चार दिवस आधीच दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी अकरावीची सीईटी द्यावी लागणार आहे. या सीईटीच्याआधारेच विद्यार्थ्यांना विविध नामांकित महाविद्यालयांमध्ये त्यांच्या गुणवत्तेनुसार प्रवेश मिळणार आहे. जे विद्यार्थी या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरतील, त्यांना हॉल तिकीटही ऑनलाईन मिळणार आहेत. शंभर गुणांची परीक्षा असणार आहे. या प्रवेश परीक्षेसाठी राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जाणार असून, १०० गुणांच्या या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत. ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाईन पध्दतीने ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दोन तासांचा अवधी दिला जाणार आहे.

सीईटी परीक्षेतल्या गुणांच्या आधारावरच विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. जे विद्यार्थी ही परीक्षा देतील, त्यांना अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर अन्य विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. मात्र जे विद्यार्थी ही सीईटी देणार नाहीत, त्यांचे मूल्यमापन दहावीच्या गुणांच्या आधारावर करण्यात येणार आहे. कित्येक दिवस प्रतीक्षा लागून राहिलेली सीईटी परीक्षा अखेर जाहीर केल्याने विद्यार्थ्यांमधील संभ्रम मात्र दूर झाला आहे.

Web Title: Availability of online application for Eleventh CET Exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.