चिपळूण मुस्लिम समाजातर्फे कोरोनाबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:29 AM2021-05-01T04:29:33+5:302021-05-01T04:29:33+5:30
अडरे : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. चिपळुणात वेगळी परिस्थिती नाही. शासनाने कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी काही नियमांचे पालन करण्याचे ...
अडरे : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. चिपळुणात वेगळी परिस्थिती नाही. शासनाने कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी काही नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तरीही काही नागरिकांकडून पालन होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर चिपळूण मुस्लिम समाजाने सोशल मीडिया तसेच रिक्षाद्वारे जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने समाजात भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, योग्य ती खबरदारी घेतल्यास कोरोनातून बरे होता येते. सर्दी, खोकला, ताप आल्यास आपल्या नजीकच्या रुग्णालयात अथवा फॅमिली डॉक्टर तसेच शासकीय रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन केले आहे. मात्र, घाबरून जाऊ नका, असेही जनजागृतीद्वारे आवाहन करण्यात येत आहे.
विनाकारण बाहेर फिरणे टाळा, गर्दीच्या ठिकाणी शक्यतो जाऊ नका, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करा आणि सॅनिटायझरचा वापर करा, असे आवाहन केले आहे. ही जनजागृती शहर परिसरासह ग्रामीण भागात अलोरे, शिरगाव, मालदोली आदी ठिकाणी केली जात आहे, एकंदरीत चिपळूण मुस्लिम समाजाने योग्यवेळी नागरिकांना जागरूक करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.