रत्नागिरी महिला बचत गटांच्या माध्यमातून काेविडबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:29 AM2021-03-21T04:29:37+5:302021-03-21T04:29:37+5:30

महिला बचत गटाच्या माध्यमातून जनजागृती माेहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी सुती मास्क विक्री केंद्राचा शुभारंभ उपनगराध्यक्ष राेशन फाळके ...

Awareness about Kavid through Ratnagiri Women's Self Help Groups | रत्नागिरी महिला बचत गटांच्या माध्यमातून काेविडबाबत जनजागृती

रत्नागिरी महिला बचत गटांच्या माध्यमातून काेविडबाबत जनजागृती

Next

महिला बचत गटाच्या माध्यमातून जनजागृती माेहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी सुती मास्क विक्री केंद्राचा शुभारंभ उपनगराध्यक्ष राेशन फाळके यांच्या हस्ते करण्यात आला. (छाया : तन्मय दाते)

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : केंद्र व राज्य शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियांतर्गत महिला बचत गटाच्या माध्यमातून सुती मास्क तयार करण्यात आले आहेत. या मास्क विक्री केंद्राचा शुभारंभ रत्नागिरी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष रोशन फाळके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी काेविडबाबत जनजागृतीही करण्यात आली.

रत्नागिरी नगर परिषद संचलित महिला बचत गटाच्या आधार शहरस्तर संघ आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने मास्क शिलाई आणि कोविड-१९ बाबत जनजागृती अभियान राबविण्यात आल. यावेळी शहरातील एस. टी. स्टॅण्ड परिसर, गाडीतळ, कोकण नगर, मारुती मंदिर, साळवी स्टॉप, नगर परिषद आदी भागात प्रभात फेरी आणि पथनाट्याच्या माध्यमातून कोविड १९ बाबत जनजागृती करण्यात आली.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शहर प्रकल्प अधिकारी संभाजी काटकर, महिला समूह संघटिका सारिका मिरकर, आधार शहरस्तर संघ अध्यक्षा जानव्ही जाधव, सचिव शिवानी पवार, सदस्य निकिता जगताप, अमिता शिवलकर, गुलणार पकली, रागिणी यशवंतराव, छाया सावन्त, श्रद्धा शिंदे, दीपा घोटणकर आदींनी प्रयत्न केले.

Web Title: Awareness about Kavid through Ratnagiri Women's Self Help Groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.