आराेग्य तपासणी शिबिरातून महिलांमध्ये जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:30 AM2021-03-19T04:30:28+5:302021-03-19T04:30:28+5:30

चिपळूण : कर्करोगाबाबत महिलांमध्ये जनजागृती व्हायला हवी, या उद्देशाने ऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटर, चिपळूण तसेच लायन्स क्लब ऑफ चिपळूण ...

Awareness among women through health check-up camps | आराेग्य तपासणी शिबिरातून महिलांमध्ये जनजागृती

आराेग्य तपासणी शिबिरातून महिलांमध्ये जनजागृती

Next

चिपळूण : कर्करोगाबाबत महिलांमध्ये जनजागृती व्हायला हवी, या उद्देशाने ऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटर, चिपळूण तसेच लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सी यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग जनजागृती व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून महिलांमध्ये कर्करोगाविषयी जनजागृती करण्यात आली.

ऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटर येथील स्तन व गर्भाशय कॅन्सर विभागाच्या प्रमुख, स्त्री कर्करोग तज्ज्ञ डॉ. तेजल गोरासिया-खडकबाण यांनी याठिकाणी महिलांमधील कॅन्सरचे वाढते प्रमाण, जनजागृतीचा अभाव, कर्करोगाची लक्षणे, उपचार आदी विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सीचे अध्यक्ष एकता मुळे, हॉस्पिटलमधील डॉ. पद्मजा रेडिज, विनायक भोसले, अभिजित सुर्वे उपस्थित होते.

स्तनाचा कर्करोग म्हणजे काय, तो कशामुळे होतो, यासह उपचाराची माहिती दिली. यावेळी गर्भाशयाच्या कॅन्सरबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरात प्रत्येक महिलेची नावनोंदणी करून, त्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली.

Web Title: Awareness among women through health check-up camps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.