मंडणगड बसस्थानकासह आगारातील इमारतीची दुरावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:22 AM2021-06-25T04:22:51+5:302021-06-25T04:22:51+5:30
मंडणगड : निसर्ग चक्रीवादळात मंडणगड बसस्थानक व आगाराच्या इमारतीचे नुकसान झाले़ त्यानंतर एक वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही वादळामुळे ...
मंडणगड : निसर्ग चक्रीवादळात मंडणगड बसस्थानक व आगाराच्या इमारतीचे नुकसान झाले़ त्यानंतर एक वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही वादळामुळे नुकसान झालेल्या इमारतीची डागडुजी करण्याची तसदी आगार व्यवस्थापक वा स्थानिक व्यवस्थापनाने घेतलेली नाही. इमारतीच्या दुरावस्थेकडे काेणाचेच लक्ष न गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़ त्यामुळे प्रवाशांसह कर्मचाऱ्यांना यंदाच्या पावसात विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
चक्रीवादळात बसस्थानक व आगाराचे इमारतीचे छप्पराचे नुकसान झाले. त्यामुळे ठिकठिकाणी गळीत लागली त्यामुळे प्रवाशांना गळती लागलेल्या बसस्थानकात गाड्यांची वाट पाहत बसावे लागले तर कर्मचाऱ्यांच्या गळक्या आजारात भिजत काम करावे लागले आहे. या परिस्थितीत यंदाच्या पावसाला सुरुवात होण्यापूर्वी तरी सुधारणी होतील, अशी अपेक्षा होती़ मात्र, इमारतीची दुरूस्ती न केल्याने यावर्षीही पावसात आगारातील कर्मचारी पावसात भिजून काम करत असल्याने ते आजारी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे़ बसस्थानकास मोठी गळती लागली असून, प्रवाशांना भिजून गाडीत बसविण्याच्या एस. टी. प्रशासनाच्या अजब सुविधेबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.