लांजातील खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 01:36 PM2017-10-04T13:36:16+5:302017-10-04T13:41:26+5:30

लांजा शहरात १७ प्रभागांमध्ये पावसाळ्यात पडलेले खड्डे बुजवण्यासाठी नेमलेल्या ठेकेदाराकडून अतिशय निकृष्ट दर्जाचे खड्डे भरल्याने ‘जैसे थे’ परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. या ठेकेदाराच्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी लांजा नगरपंचयातीच्या विरोधी पक्षाकडून करण्यात आली आहे.

Badge work | लांजातील खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट

लांजातील खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट

Next
ठळक मुद्देठेकेदाराकडून अतिशय निकृष्ट दर्जाचे खड्डे भरल्याने ‘जैसे थे’ परिस्थितीनगरसेवकांकडून कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी सात नगरसेवकांकडून मुख्याधिकाºयांना लेखी निवेदन

लांजा, दि. ४ : शहरात १७ प्रभागांमध्ये पावसाळ्यात पडलेले खड्डे बुजवण्यासाठी नेमलेल्या ठेकेदाराकडून अतिशय निकृष्ट दर्जाचे खड्डे भरल्याने ‘जैसे थे’ परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. या ठेकेदाराच्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी लांजा नगरपंचयातीच्या विरोधी पक्षाकडून करण्यात आली आहे.


लांजा नगरपंचायतीमध्ये शहर विकास आघाडी या विरोधी पक्षातील सात नगरसेवकांनी मुख्याधिकाºयांना लेखी निवेदन देऊन खड्ड्याच्या कामामध्ये घोटाळा करणाºया ठेकेदाराच्या कामाच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही निविदा काढून खड्डे भरण्याचे काम अपेक्षित होते; परंतु तसे झाले नाही. अनेक ठिकाणी भरलेले खड्डे निकृष्ट दर्जाचे असून खड्ड्यांमध्ये फक्त दगड व माती टाकण्यात आलेली होती. ती पावसामध्ये वाहून गेल्याने पूर्वी जी परिस्थिती होती, तीच पुन्हा निर्माण झाली आहे. काही ठिकाणचे खड्डे भरण्याचे काम अपुरे असताना काम पूर्ण झाल्याचे दाखवून बिले अदा करण्याचे काम मात्र प्रगतीपथावर आहे.

या निवेदनावर गटप्रमुख संपदा वाघधरे, रवींद्र कांबळे, मानसी डाफळे, दिलीप मुजावर, तनिषा कांबळे, मदन राडये, तृप्ती वाघधरे या लांजा कुवे शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी लेखी मागणी मुख्याधिकाºयाकडे केली आहे.
 

Web Title: Badge work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.