गांजा विक्रीप्रकरणी संशयितांना जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:34 AM2021-08-27T04:34:34+5:302021-08-27T04:34:34+5:30
खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील एका बंद कारखान्याच्या बाहेर गांजा विक्रीप्रकरणी अटक केलेल्या पाचजणांना येथील न्यायालयाने २६ ऑगस्ट ...
खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील एका बंद कारखान्याच्या बाहेर गांजा विक्रीप्रकरणी अटक केलेल्या पाचजणांना येथील न्यायालयाने २६ ऑगस्ट रोजी जामीन मंजूर केला.
याप्रकरणी खेड पोलिसांनी १८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्यासुमारास गांजासह राकेश रमेश माने (वय २४, रा. तलारीवाडी, गुणदे, खेड), सूरज लक्ष्मण वरक (२०, रा. तलारीवाडी, लोटे, खेड), अमान हुसेन सौतीरकर (२०, रा. गवळीवाडी, घाणेखुंट, खेड), विजय मारुती लोहार (१९, रा. लोटेमाळ, खेड) व मुस्तफा इम्तियाक शहा (१८, रा. गवळीवाडी, घाणेखुंट, खेड) यांना लोटे औद्योगिक वसाहतीत बंद असलेल्या मोरॅक्स कंपनीच्या बाहेर २१५ ग्रॅम वजनाच्या सुमारे ३२२५ रुपये किमतीच्या गांजासह पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या पाचही संशयितांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली होती. संशयितांतर्फे ॲड. सिध्देश बुटाला, ॲड. अमोल जगताप, ॲड. फारुक म्हतारनाईक यांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावरील युक्तिवाद ग्राह्य धरुन खेड जिल्हा सत्र न्यायालयाने अटी व शर्तीवर पाचही संशयितांची प्रत्येकी पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिनावर मुक्तता केली.