गणेशोत्सवात तीन दिवस मद्य विक्री बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:37 AM2021-09-10T04:37:50+5:302021-09-10T04:37:50+5:30
रत्नागिरी : येत्या १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत जिल्ह्यात ...
रत्नागिरी : येत्या १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मुंबई मद्य निषेध अधिनियम १९४९ चे कलम १४२ अन्वये जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी तीन दिवस मद्य विक्रीला बंदी घातली आहे.
जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार १० सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी, १४ सप्टेंबर रोजी गौरी-गणपती विसर्जन आणि १९ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी या तीन दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व देशी-विदेशी मद्य व माडी विक्री अनुज्ञप्ती संपूर्ण दिवस मद्य-माडी विक्रीस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून, यामध्ये कसूर केल्यास संबंधित अनुज्ञप्ती धारकाविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात म्हटले आहे.