देवरुखात बँक कर्मचाऱ्यांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:31 AM2021-03-18T04:31:37+5:302021-03-18T04:31:37+5:30

देवरुख : सोमवारपाठोपाठ मंगळवारी बँकांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांनी देवरुखमधील आयडीबीआय देवरुख शाखेसमोर जोरदार ...

Bank employees protest in Devrukha | देवरुखात बँक कर्मचाऱ्यांची निदर्शने

देवरुखात बँक कर्मचाऱ्यांची निदर्शने

Next

देवरुख : सोमवारपाठोपाठ मंगळवारी बँकांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांनी देवरुखमधील आयडीबीआय देवरुख शाखेसमोर जोरदार निदर्शने केली. यानंतर खासगीकरण विरोधातील निवेदन संगमेश्वर तालुक्याचे तहसीलदार सुहास थोरात यांना देण्यात आले.

यावेळी बाजारपेठेतील व्यापारी चारू तळेकर, कापडी एन्क्लोजचे इस्त्याक कापडी, प्रल्हाद गायकवाड, बबन बोदले यांनी प्लेकार्ड हातात घेऊन बऱ्याच वेळ निदर्शने केली. त्यानंतर माजी सभापती संतोष लाड, काटवली गावचे उपसरपंच शेखर पांचाळ, महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे ऋतुराज देवरुखकर, श्रमिक आर्टचे मालक मिहीर आर्ते यांनी जनतेला खासगीकरणाबाबत मार्गदर्शन केले.

सरकारी बँकांचे खासगीकरण करण्यामागे सरकारचा कुटिल डाव आहे. लोकांनी याचा विरोध केला पाहिजे, असे यावेळी अर्थ व नगरविकासचे माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी सांगितले. माजी आमदार सुभाष बने व माजी आमदार सदानंद चव्हाण, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने आणि पंचायत समितीचे माजी सभापती सुजित महाडिक यांनीही येथे उपस्थित राहून संपाला पाठिंबा दिला. यानंतर युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने जनतेने खासगीकरणाच्या विरोधात सह्या केलेले निवेदन संगमेश्वरचे तहसीलदार सुहास थोरात यांची भेट घेऊन त्यांना दिले. या सर्वांचे नेतृत्व कॉम्रेड विनोद कदम यांनी केले.

........................

फोटो आहे.

Web Title: Bank employees protest in Devrukha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.