पालिकेचे लेखा परीक्षण पारदर्शक हवे : केळसकर

By admin | Published: November 30, 2014 09:53 PM2014-11-30T21:53:20+5:302014-12-01T00:12:09+5:30

महाराष्ट्र राज्य कोकण क्षेत्र, कोकण भवन संचालक स्थानिक लेखा परीक्षण विभाग यांच्याकडे केली

Bank's audit should be transparent: Kelaskar | पालिकेचे लेखा परीक्षण पारदर्शक हवे : केळसकर

पालिकेचे लेखा परीक्षण पारदर्शक हवे : केळसकर

Next

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेचे २०१३-१४ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण सुरु करण्यात आले आहे. यापूर्वी आक्षेप असलेल्या बाबींची चौकशी न करता हे लेखा परीक्षण सुरु असून, ते पारदर्शक करण्यात यावे, अशी मागणी सत्ताधारी गटाचे नगरसेवक अविनाश केळसकर यांनी महाराष्ट्र राज्य कोकण क्षेत्र, कोकण भवन संचालक स्थानिक लेखा परीक्षण विभाग यांच्याकडे केली आहे.
मागील आक्षेपांबाबत काय पूर्तता केली, याची माहिती नगर परिषदेचे विश्वस्त व नागरिकांना दिली जात नाही. अशा कार्यपद्धतीमुळे नगर परिषदेच्या संबंधित विभागप्रमुखांना कोणी विचारणारा नाही, असे समजून लेखा परीक्षण सुरु आहे. नगर परिषदेचा कारभार पारदर्शक आहे का? याबाबत शंका निर्माण होत आहे.
वाहन विभाग, पाणी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग व त्याच्याशी संबंधित असणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन व बांधकाम विभाग यांची माहिती अधिकाराखाली घेण्यात माहिती आली असून, ती पाहिली असता चार विभागांमध्ये शासन व जनतेकडून येणाऱ्या निधीचा संगनमताने गैरवापर केल्याचे माहितीतून पुढे आले आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी नगर परिषदेत चाललेल्या गैरकारभाराबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल करण्यात आली आहे. याबाबत चौकशीचे आदेश देऊन ३१ डिसेंबरपर्यंत न्यायालयात अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित शासनाच्या प्रमुखांना देण्यात आले.
सध्या नगरपरिषदेच्या चालू करण्यात आलेल्या लेखा परीक्षणामध्ये आर्थिक हितसंबंधाशी कुठे गैरप्रकार झाला, अगर कसे? याची जरुर पडल्यास संबंधित कागदाशी निगडीत असणाऱ्या फर्म अथवा दुकाने यांची त्या त्या ठिकाणी खरोखर व्यवहार निश्चित घडले आहेत का? हे पाहण्याची वेळ आज लेखा परीक्षणात आली असून, ती करणे जरुरीची आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Bank's audit should be transparent: Kelaskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.