बाप्पा विराजमान...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:52 PM2017-08-26T12:52:08+5:302017-08-26T12:52:11+5:30
रत्नागिरी : सकाळपासून ढगाळ वातावरण असताना शिवाय पावसाच्या अधूनमधून हलक्या सरी कोसळत असताना देखील ढोल ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत जिल्ह्यात १ लाख ६७ हजार ५४३ घरगुती तर ११२ सार्वजनिक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. घरोघरी बसविण्यात आलेल्या गणपतीची विधीवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली.

गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी अवघा भक्तगण उत्साही झाला होता. मुंबईकरांचे देखील मोठ्या संख्येने आगमन झाले असून, गेले चार दिवस एसटी, रेल्वे, खासगी गाड्यातील गर्दी ओसंडून वहात आहे. पाऊस सरीवर कोसळत असला तरी चारचाकी खासगी वाहनांनी तसेच दुचाकीने देखील मुंबईकर गावी आले आहेत.
पावसामुळे एक दिवस आधीच गणपतीमूर्ती घरी नेण्यात आल्या असल्या तरी सकाळपासूनच शहरी, ग्रामीण भागात सर्वत्र ढोल ताशे, बेंजोंचे आवाज निनादत होते. गणेशमूर्तीकारांनी देखील आगावू मागणी असणाºयांचे गणपती तयार करून ठेवले होते. डोक्यावरून, हातगाडी, दुचाकी, चारचाकी टेम्पो, ट्रक मधून गणेशमूर्ती घरी नेण्यात येत होत्या. त्यामुळे गणेशमूर्ती कारखान्यासमोर गणेशभक्तांची गर्दी झाली होती. छत्री, प्लास्टिक पेपरचा वापर गणपती नेण्यासाठी केला जात होता.