बारामती ॲग्रो संस्थेतर्फे खेडमधील पूरग्रस्तांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:33 AM2021-07-28T04:33:27+5:302021-07-28T04:33:27+5:30

खेड : कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या बारामती ॲग्रो या संस्थेतर्फे मंगळवारी खेड शहरातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा ...

Baramati Agro helps flood victims in Khed | बारामती ॲग्रो संस्थेतर्फे खेडमधील पूरग्रस्तांना मदत

बारामती ॲग्रो संस्थेतर्फे खेडमधील पूरग्रस्तांना मदत

Next

खेड : कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या बारामती ॲग्रो या संस्थेतर्फे मंगळवारी खेड शहरातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला. यावेळी आमदार योगेश कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्यासह शिवसेना व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अतिवृष्टीमध्ये खेड व चिपळूण तालुक्यात हाहाकार झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन तालुक्यात मदतीचा ओघ सुरू झाला आहे. कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारपासून कोकण दौरा सुरू केला. खेड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी रोहित पवार व आमदार योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खेडमधील पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत देण्यात आली. यावेळी आमदार योगेश कदम यांनी व राष्ट्रवादी पदाधिकारी यांनी आमदार पवार यांचे आभार मानले. आमदार पवार यांनी खेडमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली व सरकारपर्यंत येथील नागरिकांच्या भावना पोहोचवून आवश्यक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी आमदार संजय कदम, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस अजय बिरवटकर, सतीश चिकणे, अजय माने यांच्यासह शिवसेना व राष्ट्रवादीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

--------------------------------------

खेड येथील पूरग्रस्तांना आमदार रोहित पवार व आमदार याेगेश कदम यांच्या हस्ते मदतीचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, माजी आमदार संजय कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते.

Web Title: Baramati Agro helps flood victims in Khed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.