बारसू प्रकल्प विरोधी समितीचे अध्यक्ष अमोल बोळे पाेलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 05:36 PM2023-05-05T17:36:17+5:302023-05-05T18:08:27+5:30

उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट पाेलिस बंदोबस्त ठेवला

Barsu Project Anti Committee President Amol Bole in police custody | बारसू प्रकल्प विरोधी समितीचे अध्यक्ष अमोल बोळे पाेलिसांच्या ताब्यात

बारसू प्रकल्प विरोधी समितीचे अध्यक्ष अमोल बोळे पाेलिसांच्या ताब्यात

googlenewsNext

विनाेद पवार

राजापूर : गर्दी जमवणे, पाेलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणे या आराेपांखाली राजापूर बारसू रिफायनरी प्रकल्प विरोधी समितीचे अध्यक्ष अमोल बोळे यांना राजापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली.

राजापूर तालुक्यातील नाणार रिफायनरीचा मोर्चा बारसूकडे वळल्यानंतर येथील रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली बारसू रिफायनरी प्रकल्प विरोधी आंदोलने करण्यात आली. गेल्या आठवड्यात प्रस्तावित बारसूच्या माळरानावर माती परीक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम सुरू झाल्यानंतर अमोल बोळे यांनी गर्दी जमवून माती परीक्षणाच्या कामाला विरोध केला होता. त्यानंतर त्यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली होती.

बारसू प्रकल्प विरोधकांना भेटण्यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे ६ मे राेजी बारसू येथे येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट पाेलिस बंदोबस्त ठेवला आहे. त्याच अनुषंगाने अमोल बोळे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या त्यांना राजापूर पोलिस स्थानकात काेठडीत ठेवले आहे.

Web Title: Barsu Project Anti Committee President Amol Bole in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.