राजन साळवी..कोकणची वाळवी; बारसू प्रकल्प विरोधकांची उद्धव ठाकरेंसमोरच जोरदार घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 02:33 PM2023-05-06T14:33:31+5:302023-05-06T14:35:58+5:30

स्थानिकाना रोजगार या मुद्द्यावर आमदार राजन साळवी यानी उघडपणे प्रकल्पाचे समर्थन सुरु केले होते

Barsu project opponents raised slogans against MLA Rajan Salvi in ​​front of Uddhav Thackeray | राजन साळवी..कोकणची वाळवी; बारसू प्रकल्प विरोधकांची उद्धव ठाकरेंसमोरच जोरदार घोषणाबाजी

राजन साळवी..कोकणची वाळवी; बारसू प्रकल्प विरोधकांची उद्धव ठाकरेंसमोरच जोरदार घोषणाबाजी

googlenewsNext

विनोद पवार

राजापूर : राजन साळवी.. कोकणची वाळवी, एवढी माणसे कशाला राजन साळवीच्या मैताला अशी घोषणाबाजी करत आज बारसू प्रकल्प विरोधकांनी चक्क पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमोरच राजापूरचे आमदार राजन साळवी यांचा उध्दार केला. साळवी यांनी काही दिवसापुर्वीच प्रकल्पाचे समर्थन केले होते. मात्र, पुन्हा आपली भूमिका बदलून ते प्रकल्प विरोधात उभे राहिले आहेत. असे असतानाच सोलगाव फाट्यावर प्रकल्पविरोधकांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. 

रिफायनरी प्रकल्प बारसु येथे होण्यासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केंद्राला पत्र दिल्यानंतर स्थानिकाना रोजगार या मुद्द्यावर आमदार राजन साळवी यानी उघडपणे प्रकल्पाचे समर्थन सुरु केले होते. तर दुसरीकडे खासदार विनायक राउत हे सातत्याने प्रकल्पाच्या विरोधात होते. मात्र मागील आठवड्यात बारसुचे आंदोलन पेटल्याने व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा निश्चित झाल्यानंतर पुन्हा आमदार राजन साळवी यानी यु टर्न घेत आपली भुमिका बदलली होती. यानंतर त्यांनी पुन्हा प्रकल्पाला विरोध करायला सुरुवात केली. मात्र त्यांचा सध्याचा विरोध हा दबावातूनच असल्याची चर्चा सुरु आहे.

उद्धव ठाकरेंनी आज, बारसु दौऱ्यावर येत असताना रस्त्यातमध्ये सोलगाव फाट्यावर काही प्रकल्प विरोधकांची भेट घेत चर्चा केली. यावेळी उपस्थित प्रकल्प विरोधकांनी आमदार राजन साळवी यांच्या विरोधात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोरच जोरदार घोषणाबाजी केली.

Web Title: Barsu project opponents raised slogans against MLA Rajan Salvi in ​​front of Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.