चिपळुणात किरकोळ कारणावरून एकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:36 AM2021-08-24T04:36:22+5:302021-08-24T04:36:22+5:30
चिपळूण : किरकोळ कारणातून निर्माण झालेल्या वादातून सख्ख्या भावाने दुसऱ्या भावाला मारहाण केल्याची घटना तीन दिवसांपूर्वी तालुक्यातील येगाव येथे ...
चिपळूण : किरकोळ कारणातून निर्माण झालेल्या वादातून सख्ख्या भावाने दुसऱ्या भावाला मारहाण केल्याची घटना तीन दिवसांपूर्वी तालुक्यातील येगाव येथे घडली. याप्रकरणी सावर्डे पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची फिर्याद बाळाराम रामचंद्र पाटील (६२, रा. येगाव) यांनी दिली आहे. या फिर्यादीनुसार शांताराम रामचंद्र पाटील, सुनीता शांताराम पाटील, कळू अनंत केळसकर (सर्व रा. येगाव-गवळवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताराम व बाळाराम हे सख्खे भाऊ असून, त्यांच्यात जागेवरुन पूर्वीपासून वाद असल्याने ते एकमेकांशी बोलत नाहीत. यावेळी बाळाराम यांनी शांताराम याला ‘तू घराकडून येणारे पावसाचे पाणी का सोडलेस’, अशी विचारणा केली. यातूनच झालेल्या वादातून बाळाराम यांना शांताराम पाटील, सुनीता पाटील व कळू केळसकर यांनी पकडले. त्यानंतर शांताराम याने त्यांना दगडाने तर सुनीता हिने लाकडी काठीने मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या कानाला दुखापत झाली आहे.