मंडणगडमध्ये ५ लाख रुपये किंमतीचे गोवंशाचे मांस जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 03:46 PM2021-03-30T15:46:45+5:302021-03-30T15:48:16+5:30

Crime News Police Ratnagiri-मंडणगड तालुक्यातील दाखवणं - कुंबळे मार्गावरील वेलोते गावाजवळ ५ लाख रुपये किंमतीचे २ हजार ५०० किलो वजनाचे गोवंशाचे मांस वाहून नेणाऱ्या मुंबईतील दोघांना कस्टम विभागाने पकडले आहे. हे मांस मुंबईमध्ये कुर्ल्यात घेऊन जाण्यासाठी वाहतूक केली जात होती. सोमवारी मध्यरात्री साडेबारा नंतर ही कारवाई करण्यात आली.

Beef worth Rs 5 lakh seized in Mandangad | मंडणगडमध्ये ५ लाख रुपये किंमतीचे गोवंशाचे मांस जप्त

मंडणगडमध्ये ५ लाख रुपये किंमतीचे गोवंशाचे मांस जप्त

Next
ठळक मुद्दे २ हजार ५०० किलो वजनाचे मांसकारवाईत टेम्पो जप्त, मुंबईतील दोघे पोलिसांच्या ताब्यात

मंडणगड : तालुक्यातील दाखवणं - कुंबळे मार्गावरील वेलोते गावाजवळ ५ लाख रुपये किंमतीचे २ हजार ५०० किलो वजनाचे गोवंशाचे मांस वाहून नेणाऱ्या मुंबईतील दोघांना कस्टम विभागाने पकडले आहे. हे मांस मुंबईमध्ये कुर्ल्यात घेऊन जाण्यासाठी वाहतूक केली जात होती. सोमवारी मध्यरात्री साडेबारा नंतर ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी कस्टम विभागाच्या पथकाने सैफ अस्लम कुरेशी (रा. कुर्ला मुंबई) व इरफान अमिनुद्दीन कुरेशी (रा. गोवंडी) या दोघांना ताब्यात घेतले आहे.

दापोली कस्टम विभागाचे अधिकारी जे. एम . भोईटे, डी. एस. गायकवाड व त्याच्या पथकाने त्यांची चौकशी केली‌. या गाडीमध्ये दहा ते बारा बैलांची व २ ते ३ म्हैशींचे मांस घेऊन ते महेंद्र पिकअप बोलेरो गाडीमध्ये घेऊन मुंबईला चालले होते.

Web Title: Beef worth Rs 5 lakh seized in Mandangad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.