करंजेश्वरीच्या शिमगोत्सवाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 03:31 PM2019-03-21T15:31:02+5:302019-03-21T15:31:54+5:30
गोवळकोट - पेठमाप आणि मजरेकाशी या गावांचे जागृत देवस्थान व ग्रामदैवत श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या प्रसिध्द शिमगोत्सवाला ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीने प्रारंभ झाला. या देवस्थानच्या दोन्ही पालख्यांचे रात्री उशिरा पेठमापकडे प्रस्थान झाले असून, येथील सहाणेवर दिनांक १९ रोजी मुक्कामी असणार आहेत.
चिपळूण : गोवळकोट - पेठमाप आणि मजरेकाशी या गावांचे जागृत देवस्थान व ग्रामदैवत श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या प्रसिध्द शिमगोत्सवाला ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीने प्रारंभ झाला. या देवस्थानच्या दोन्ही पालख्यांचे रात्री उशिरा पेठमापकडे प्रस्थान झाले असून, येथील सहाणेवर दिनांक १९ रोजी मुक्कामी असणार आहेत.
संपूर्ण कोकणात सर्वात मोठा व गुलालमुक्त शिमगा म्हणून प्रसिध्द असलेल्या या शिमगोत्सवानिमित्त येथे सजावट करण्यात आली आहे. या शिमगोत्सवाला सोमवारी दुपारी ३ वाजता मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा घालून सुरुवात करण्यात आली.
यावेळी भोईबांधवांनी दोन्ही पालख्या उंचावून भाविकांना सलामी दिली. त्यानंतर श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी अशा दोन्ही पालख्यांची देऊळवाडी, सहाणवाडी, ढवणनाका अशी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
यानंतर या दोन्ही पालख्यांनी सहाणवाडी येथील होम लावून गोविंदगडावर प्रस्थान केले. या ठिकाणी जगताप कुटुंबीयांतर्फे मानाची पूजा करण्यात आली. यानिमित्त भाविकांनी गर्दी केली होती.