उपशिक्षक पावरा यांचे उपोषण मागे
By admin | Published: April 17, 2017 06:28 PM2017-04-17T18:28:47+5:302017-04-17T18:28:47+5:30
खोत, नंदलाल शिंदे यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी
Next
आॅनलाईन लोकमत
रत्नागिरी : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर उपशिक्षक सुशीलकुमार जहांगीर पावरा यांनी आपले बेमुदत उपोषण मागे घेतले आहे.
खेड तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, सुकदरचे उपशिक्षक पावरा यांची कागदपत्रे प्रशासनाकडून गहाळ झाली होती.
याप्रकरणी दापोलीचे गटशिक्षणाधिकारी जे. जे. खोत आणि विस्तार अधिकारी नंदलाल शिंदे यांची चौकशी करुन त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र, त्यांची पूर्तता होत नसल्याने त्यांनी अनेकदा आंदोलनाचा मार्ग पत्करला होता. दरम्यान, शनिवारी त्यांनी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती. (शहर वार्ताहर)