कचऱ्यासाठी घंटागाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:31 AM2021-05-16T04:31:10+5:302021-05-16T04:31:10+5:30
परिचारिकांचा सन्मान दापोली : जेसीआय दापोली या संस्थेमार्फत उपजिल्हा रुग्णालयातील १७ परिचारिकांचा सन्मान करण्यात आला. या महिला योद्ध्यांचा सन्मानपत्र ...
परिचारिकांचा सन्मान
दापोली : जेसीआय दापोली या संस्थेमार्फत उपजिल्हा रुग्णालयातील १७ परिचारिकांचा सन्मान करण्यात आला. या महिला योद्ध्यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला जेसीआय दापोलीचे अध्यक्ष कुणाल मंडलिक, समीर कदम, अतुल गोंदकर, मयूर मंडलिक, मयूरेश शेठ, प्रसाद दाभोळे, सिध्देश शिगवण तसेच परिचारिका उपस्थित होत्या.
लासन्स क्लबच्या अध्यक्षपदी चेतन जैन
दापोली : येथील लासन्स क्लबच्या अध्यक्षपदी दापोलीतील व्यापारी चेतन जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. लायन्स क्लबच्या सभेत ही निवड करण्यात आली. अध्यक्ष म्हणून चेतन जैन, सचिव नीलेश हेदूकर, खजिनदार म्हणून केतन वणकर यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल सर्वांचे अभिनंदन होत आहे.
रस्त्यांची कामे रखडली
खेड : उत्तर रत्नागिरीमधील नादुरुस्त रस्ते धोकादायक ठरत आहेत. १५ मेनंतर शासकीय डांबरीकरण कामे बंद केली जातात. मात्र शासनाने विशेष दुरुस्तीसह अन्य महत्त्वाची रस्ते रुंदीकरण कामे दोन वर्षांपूर्वी मंजूर करून दिली. यांच्या निविदा प्रसिध्द करून ठेकेदारही नेमले. मात्र कामाचे आदेश न मिळाल्यामुळेच संबंधित ठेकेदारांनी ती कामे केली नाहीत. उत्तर रत्नागिरीमधील प्रमुख राज्यमार्ग, जिल्हामार्गासह, अन्य महत्त्वाचे रस्ते डांबरीकरण होणे गरजेचे होते.
साहित्याचे वाटप
दापोली : दापोली ग्रामसेवक संघटनेकडून कोविड सेंटरला गटविकास अधिकारी आर. एम. दिघे यांच्या उपस्थितीत आरोग्य रक्षक साहित्याचे वाटप करण्यात आले. कोविड सेंटरला डिजिटल ब्लड प्रेशर चेकअप मशीन, थर्मल गन, पल्स ऑक्सिमीटर, एन ९५ मास्क, हॅण्ड ग्लोव्हज, हेड कॅप, डिस्पोजेबल ५ लेयर मास्क आदी आरोग्य सुरक्षा सुविधा देण्यात आल्या.
कामे रखडल्याने नाराजी
खेड : शहरातील शिवाजीनगर परिसरातील मराठा भवन इमारतीसमोर प्रबोधनकार उद्यानाच्या सुशोभीकरणाचे काम रखडले आहे. सुशोभीकरणाबाबत कामाला आवश्यक तो निधी मंजूर झालेला आहे. हे काम कधी पूर्ण होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्यानाच्या सुशोभीकरणाच्या कामात कोणतीही प्रगती दिसून येत नाही. फक्त उद्यान परिसरात मातीचा भराव टाकून त्याचे सपाटीकरण करण्याव्यतिरिक्त अन्य कोणतेही काम झालेले नाही.
उंबर्ले येथे परिचारिका दिन
दापोली : उंबर्ले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश तलाठी, रत्नागिरी जिल्हा परिषद संघटनेच्या उपसचिव सिंधू भाटकर, आरोग्य सहाय्यिका प्रमिला हुडबे तसेच सर्व परिचारिका यांनी लेडी विथ द लॅम्प फ्लॉरेन्स नाइंटिंगेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
धनगरवाडीत पाणीटंचाई
खेड : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याने तालुक्यातील धनगरवाड्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई ग्रामस्थांना जाणवायला लागली आहे. याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील वावेतर्फे नातू गावातील, धनगरवाडीला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवायला लागली आहे. धनगरवाडीला शासकीय वाहनाने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करावा, अशी मागणी रामचंद्र आखाडे यांनी तहसीलदार खेड आणि गटविकास अधिकारी खेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.