शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी करावी : सोनाली झेंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:30 AM2021-04-18T04:30:30+5:302021-04-18T04:30:30+5:30
अडरे : विद्यार्थ्यांनी चांगल्या शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्रातही उत्तम कामगिरी करून यश प्राप्त करावे, असे आवाहन चिपळूण पोलीस स्थानकातील पोलीस ...
अडरे : विद्यार्थ्यांनी चांगल्या शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्रातही उत्तम कामगिरी करून यश प्राप्त करावे, असे आवाहन चिपळूण पोलीस स्थानकातील पोलीस उपनिरीक्षक सोनाली झेंडे यांनी केले.
शहरातील गोवळकोट येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत महिला व बाल सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महिला संरक्षण समिती सदस्या सोनाली मिर्लेकर, शाळेतील शिक्षिका शीतल राजे, पदवीधर शिक्षक अंकुश राऊत उपस्थित होते. यावेळी झेंडे यांनी बालकांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची दक्षता, अल्पवयीन मुलींची होणारी फसवणूक याविषयी बाळगावयाची खबरदारी यावर मार्गदर्शन केले. याचबरोबर महिला संरक्षण समिती सदस्या सोनाली मिर्लेकर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी आपल्यावर होणाऱ्या अत्याचारांविषयी पालकांशी मोकळेपणाने बोलले पाहिजे, कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे सांगितले. अंकुश राऊत यांनी आभार मानले.